Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNagarparishad Election Result 2025 : त्र्यंबकमध्ये भाजपच्या 'संकटमोचकांना' धक्का; कैलास घुलेंचा दारूण...

Nagarparishad Election Result 2025 : त्र्यंबकमध्ये भाजपच्या ‘संकटमोचकांना’ धक्का; कैलास घुलेंचा दारूण पराभव, त्रिवेणी तुंगार विजयी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी दि.२ आणि २० डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्षपदाच्या ११ जागांसाठी एकूण ५३ तर नगरसेवकपदाच्या २६४ जागांसाठी एक हजाराहून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात एकूण ६५.९४ टक्के मतदान झाले होते. यामध्ये त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत सर्वाधिक म्हणजे जवळपास ८५ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर आज (दि.२१) रोजी मतमोजणी पार पडत असून, जिल्ह्यात महायुतीने मुसंडी मारली आहे.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर आगामी सिंहस्थ मेळा डोळ्यासमोर ठेवून शहराचे प्रथम नागरिकपद आपल्याकडेच कसे राहील, यासाठी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसने पूर्णता प्रतिष्ठा पणाला लावली होती. नगराध्यक्षपदासाठी पाच पक्षीय उमेदवारांसह आठ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पंरतु, येथे दुरंगी लढत झाल्याचे बघायला मिळाले.

नगराध्यक्षपदी शिंदे सेनेच्या त्रिवेणी तुंगार-सोनवणे विजयी झाल्या असून, भाजपचे कैलास घुले यांचा तब्बल १८०० मतांनी दारुण पराभव झाला आहे. तर याठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आठ, भाजपचे सहा आणि शिंदेंच्या शिवसेनेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत .

ताज्या बातम्या

Udaipur Intercity Express accident : मोठी दुर्घटना! आग लागल्याची अफवा पसरल्याने...

0
उदयपूर । Udaipur भय आणि घबराट माणसाकडून काय करून घेईल याचा नेम नसतो, पण कधीकधी हीच घबराट प्राणांतिक ठरते, याचाच एक अत्यंत दुर्दैवी प्रत्यय मध्य...