Tuesday, July 23, 2024
Homeमहाराष्ट्रस्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; सहा जणांचा जागीच मृत्यू

स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; सहा जणांचा जागीच मृत्यू

नागपूर | Nagpur
नागपूर जिल्ह्यातील धामणा गावाजवळ असलेल्या स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत गुरवारी दुपारी भीषण स्फोट झाला. यामुळे चार महिलांसह सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर यात चार जण गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत आणि शोक संतप्त वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील धामणा परिसरातील चामुंडी एक्सप्लोसिव प्रा. ली. कंपनीत नेहमीप्रमाणे बारुद पॅकिंग व हाताळणीचे काम सुरु होते. दुपारी बारावाजेच्या सुमारास अचानक भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की, त्याचा आवाज कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. त्यानंतर या फॅक्टरीत भीषण आग लागली. मोठा आवाज झाल्यामुळे आजूबाजूच्या गावातील हजाराच्या संख्येत नागरिक या स्फोटाच्या कारखान्याकडे धावले. त्यांनी जखमींची मदत करण्याचे प्रयत्न केले ॲम्बुलन्स घटनास्थळी बोलवून सर्व जणांना नागपूरला रुग्णालयात पाठविण्यात आले.

जवळपास दोन तासानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. अजूनही कुठला अनर्थ होऊ नये यासाठी अग्निशमन दलाची वाहन घटनास्थळावर आहेत. आग विझविण्याचे काम सुरु आहे. जेव्हा स्फोट झाला, तेव्हा या कारखान्यात अनेक कामगार अडकले होते. मृत कामगारांमध्ये चार महिला असल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजू शकले नाही आहे.

दरम्यान, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल त्यांच्यासह अनिल देशमुख हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले. पोलिसांचा ताफा आणि स्फोटक विशेषज्ञ पोहोचले. त्यांनी घटनास्थळी सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या