Thursday, July 2, 2026
HomeUncategorizedनंदुरबार : नवापूर येथे वाळूच्या 13 ट्रक जप्त

नंदुरबार : नवापूर येथे वाळूच्या 13 ट्रक जप्त

नवापूर – 

नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतुकीला बंदी असतानाही वाळू वाहतूक करणारया 13 ट्रक पोलीस व महसूल विभागाने संयुक्त कारवाई करून जप्त केल्या आहेत. रात्री उशीरापर्यंत दंडात्मक कारवाई करण्याचे काम सुरू होते. प्रत्येक ट्रक मध्ये वीस टन वाळू असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

गुजरात राज्यातील तापी नदी मधून मोठ्या प्रमाणात वाळू उपासा केला जातो. त्याचा लिलाव करून गुजरात राज्यातून महाराष्ट्रात वाळू वाहतूक केली जाते. बाहेरील राज्यातून नंदुरबार जिल्हामार्गे शेजारील जिल्ह्यात किंवा राज्यात होणारी वाळू किंवा रेतीची वाहतूक नंदुरबार जिल्हा हद्दीतील रस्त्यांच्या मार्गे न करता ती जिल्हा सीमा व जिल्हांतर्गत रस्ते वगळून इतर बाहेरील मार्गांनी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले असतानाही वाळूच्या ट्रकांची वाहतुक मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.

नवापूर हद्दीत पोलीस व महसूल विभागाने संयुक्त कारवाई करून 13 ट्रक पकडल्या आहेत. वाळु वाहतूक नियमानुसार करण्यात येत आहे, सर्व प्रकारच्या रॉयल्टी भरली आहे असे वाहतूक करणार्‍या चालकांनी सांगितले.रात्री उशीरापर्यंत दंडात्मक कारवाई करण्याचे काम सुरू होते. गुजरात राज्यातील निझर येथून वाळू घेऊन जात असलेल्या 13 ट्रकला नवापुर पोलिसांनी नवरंग रेल्वे गेटजवळ पकडून तहसील कार्यालयाचा परिसरात जमा करण्यात आल्या आहेत.

निझर येथून औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे, पुणे, लातूर याठिकाणी वाळूचे भरलेले ट्रक जात असताना ही कारवाई करण्यात आलेली आहे. यासंदर्भात वाळूची वाहतूक करणारया ट्रक चालकांना विचारणा केली असता त्याच्याकडे वाहतूक व वाळू संदर्भात सर्व कागदपत्रे असल्याचे सांगण्यात येत आहे.

परंतु नंदुरबार जिल्ह्यात बंदी असताना ट्रक मार्गस्थ होत असल्याने कारवाई केली आहे.जिल्हा सीमेलगतच्या राज्यातून नंदुरबारमार्गे इतर भागात वाळू वाहतूक सुरू आहे. या भागात कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव झाला असून शासनाकडून सदर जिल्हे रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. रेती किंवा वाळू वाहतूकदारांमुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.वाळू अथवा रेतीच्या वाहतूकीमुळे जिल्ह्यात रस्त्यांची दुरावस्था होत आहे.

वाहतूक करताना अधिक वेगाने वाहतूक होत असल्याने वाळू वाहतूकीबाबत सामान्य नागरिकांचा रोष वाढला आहे. तळोदा-नंदुरबार मार्गावर वाळू वाहतूकदारांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देण्याऐवजी अडथळा होईल अशी परिस्थिती निर्माण केली. या बाबी लक्षात घेता वाळू वाहतूकीमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतूक बंदी केली आहे.दंडात्मक कारवाई करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.याबाबत सायंकाळी तहसीलदार सुनीता जर्हाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता व त्या कार्यालयातही उपस्थित नव्हत्या.

ताज्या बातम्या

Amol Kolhe : खासदार डॉ. अमोल कोल्हेंचे ‘त्या’ विधानावर स्पष्टीकरण; म्हणाले,...

0
नाशिक | Nashik राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी काल (बुधवारी) माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)...