Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारदोघा महिलांना भरधाव चारचाकीने चिरडले

दोघा महिलांना भरधाव चारचाकीने चिरडले

मोदलपाडा ता. तळोदा – Taloda – वार्ताहर :

घराजवळ उन्हात बसलेल्या दोघा महिलांना भरधाव वेगाने चारचाकी वाहनाने जोरदार ठोस दिली. यात एक महिलेच्या अंगावरून वाहन चालल्याने ती जागीच ठार झाली.

- Advertisement -

तर दुसरी महिला ही गंभीर जखमी झाली आहे. ही घटना बुधवारी सकाळी तळोदा शहरातील खानदेशी गल्ली मध्ये घडली आहे. याबाबत बेदरकारपणे वाहन चालवणार्‍या चालकावर तळोदा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा शहरातील खानदेशी गल्लीतील मयत महिला विजयाबाई भगवान कलाल ( 52) व रेहनाबी इसाख शेख या दोघे जणी थंडीमुळे आपल्या घराबाहेर उन्हात बसल्या होत्या.

त्या दरम्यान तीरथ उमाकांत शेंडे याने आपली चारचाकी गाडी बेदकारपणे चालवून या महिलांना ठोस दिली.यात विजयाबाईचा अंगावरून गाडी चालल्याने ती जागीच ठार झाली.

तर रेहनाबी या महिलेलाही धडक बसल्यामुळे गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात रुबीनाबी शेख रियाज रा.खान्देशी गल्ली यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक तीरथ उमाकांत शेंडे याच्या विरूध्द भादवि कलम 304,अ 332, 338, 279 एम.व्ही.अ‍ॅक्ट 184 प्रमाणे मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे करीत आहे. दरम्यान घटला घडल्या नंतर बघ्यांनी एकच गर्दी केली होती.

मयत विजयाबाई ही सुस्वभावी व मनमिळावू स्वभावाची होती त्यामुळे तिच्या दुर्दैवी मृत्यू ने गल्लीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत आरोपी हा फरार असून त्याचा तपास पोलीस करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या