Friday, May 3, 2024
HomeनंदुरबारAccident नंदूरबार-डहाणू बसचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Accident नंदूरबार-डहाणू बसचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

नंदूरबार l प्रतिनिधी nandurbar

धुळे (dhule) सुरत (surat) राष्ट्रीय महामार्गावर (National Highways) संथगतीने सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे दिवसेंदिवस अपघात घडत आहे. विसरवाडी गावाजवळ नंदुरबार डहाणू बसचा अपघात झाला आहे.

- Advertisement -

चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. नंदुरबार हुन (navapur) नवापूरच्या दिशेने येणाऱ्या बसला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने हुलकावणी दिली.

बसचालकाने प्रसंगावधान दाखवत प्रवाशांच्या जीव वाचविण्यासाठी बस रस्त्याच्या बाजूला दाबली. त्यात बस मातीत फसली. या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही. बस मधील लहान बालके व महिलांना पाच ते सहा प्रवाश्यांना किरकोळ मुक्कामार लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

महामार्गालगत असलेल्या खड्ड्यात बस असल्याने ट्रॅक्टरला टोचन लावून बसला बाहेर काढण्यात आले व सर्व प्रवाशांना बसवून बस रवाना करण्यात आली.

धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या आठ वर्षापासून चौपदरीकरणाच्या कामात अनेक अनियमितता असल्याने नागरिकांना अपघातांना बळी पडावे लागत आहे, याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या