Friday, May 3, 2024
Homeजळगावनंदूरबार : ‘रहस्य’ या चित्रपटाचे फेब्रुवारीत प्रदर्शन

नंदूरबार : ‘रहस्य’ या चित्रपटाचे फेब्रुवारीत प्रदर्शन

नंदुरबार | प्रतिनिधी

येथील भावेश पाटील यांनी रहस्य या चित्रपटाची निर्मिती केली असून हा चित्रपट दि.७ फेब्रुवारी २०२० मध्ये महाराष्ट्रातील १५० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचे पूर्ण शुटींग नंदुरबार जिल्ह्यात झाले असल्याची माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माते भावेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार येथे राहणार्‍या भावेश दिनेश पाटील यांनी फिल्म मेकींग व ॲनिमेशन क्षेत्रात पुण्याला शिक्षण पूर्ण करत असतांना चित्रपटाची आवड निर्माण झाली. त्यांनी २०१६ पासून त्यांनी बळीराजा, नियत, गेमओव्हर, चाबूक या ४ लघुचित्रपटांची निर्मिती केली.

त्यानंतर २०१६ मध्ये तयार करण्यात आलेल्या बळीराजा या लघुचित्रपटाला फिल्म फेस्टीवलमध्ये बेस्ट चित्रपट म्हणून पुरस्काराही मिळाला. त्यानंतर त्यांनी मोठया पडद्यावर दिग्दर्शक म्हण्ाून काम करण्याची इच्छा झाल्याने त्यांनी भावेश प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेतर्फे रहस्य नावाचा पहिला मराठी चित्रपट बनविला आहे.

येत्या ७ फेब्रुवारी २०२० मध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातील १५० चित्रपट गृहांमध्ये चित्रपट प्रसारीत होणार आहे. या चित्रपटाचे सर्व चित्रकरण २०१८ मध्ये सुरू करण्यात आले. चित्रपटातील सर्व चित्रकरण हे नंदुरबार जिल्ह्यातच झाली असून ८० टक्याचावर चित्रकरण हे तोरणमाळ येथे झालेले आहे. पुढच्या आठवडयात या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शीत होणार आहे. हा चित्रपट हॉरर असून आजच्या तरूणांविषयी माहिती आहे.

या चित्रपटामध्ये ४० टक्के व्हीएफएक्स व ऍनिमेशनचा वापर करण्यात आला असून सर्व मराठी चित्रपट रसिकांसाठी एक नवीन प्रयोग असणार आहे. १ कोटी ३० लाख रूपये खर्च या चित्रपटाला आला असून या चित्रपटात चार गाणी आहेत. त्यात सुप्रसिध्द गायक आदर्श शिंदे आणि सुनिधी चव्हाण यांनी गाणे गायीले आहेत.

या चित्रपटात सर्व नवीन कलाकारांनी अभिनय केला आहे. हा चित्रपट हॉरर असला तरी कुटूंबासमवेत पाहता येईल असा आहे. अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते भावेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी सहायक दिग्दर्शक गिरीश सुर्यवंशी, गिरीश माळी, सोनल जाधव, दिनेश पाटील आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या