Friday, December 6, 2024
Homeनंदुरबारनंदुरबारातील सर्व अकरा जागांचे निकाल जाहीर, भाजपच्या जागा घटल्या

नंदुरबारातील सर्व अकरा जागांचे निकाल जाहीर, भाजपच्या जागा घटल्या

नंदुरबार | प्रतिनिधी –

जिल्हा परिषदेच्या अकरा गटांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने चार, काँग्रेसने 3, शिवसेनेने तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागेवर विजय मिळविला आहे. या निवडणुकीत भाजपला 3 जागांवर फटका बसला आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषद पोटनिवडणूक निकाल : पाहा नंदुरबार जिल्ह्यातील निकाल

जिल्हा परिषदेच्या 11 गटांच्या निवडणुकीसाठी काल दि. 5 ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले. आज मतमोजणीच्या प्रक्रिया राबविण्यात आली. यात भाजपाने चार, काँग्रेस व शिवसेनेने प्रत्येकी 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळविला आहे.

नंदुरबार तालुक्यात 5 गटांची निवडणूक घेण्यात आली.

कोळदे गटात भाजपाच्या सुप्रिया विजयकुमार गावित या 1369 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी सेनेच्या आशा समीर पवार यांचा पराभव केला.

कोपर्ली गटात सेनेचे राम चंद्रकांत रघुवंशी हे 3004 मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपच्या पंकज प्रकाश गावित यांचा पराभव केला.

शनिमंडळ गटात सेनेच्या जागृती सचिन मोरे या विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या रेखा सागर धामणे यांचा पराभव केला.

रनाळे गटात शिवसेनेच्या सुरेश शकुंतला शिंत्रे याना 7 हजार 97 मते मिळाली तर भाजपच्या रीना पांडुरंग पाटील यांना 5 हजार 796 मते मिळाली. सेनेच्या शकुंतला शिंत्रे या 1 हजार 301 मतांनी विजयी झाल्या.

खोंडामळी गटात भाजपचे शांताराम साहेबराव पाटील हे अवघ्या 87 मतांनी विजयी झाले. त्यांना 7 हजार 77 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी सेनेचे गजानन भिका पाटील याना 6 हजार 990 मते मिळाली.

शहादा तालुक्यात 4 गटांची पोटनिवडणुक झाली. यात भाजपने 2 तर काँग्रेस व राष्ट्रवादीने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविला.

म्हसावाद गटात काँग्रेसच्या हेमलता अरुण शितोळे याना 5 हजार 804 मते मिळाली. भाजपचे पाटील शशिकांत गोविद याना 2 हजार 881 मते मिळाली. अपक्ष उमेदवार पाटील भगवान खुशाल याना 2 हजार 696 मते मिळाली.

लोणखेडा गटात भाजपच्या पाटील जयश्री दिपक विजय उमेदवार यांना 7 हजार 357 मते मिळाली. काँग्रेसचे पाटील गणेश रघुनाथ याना 3 हजार 153 मते मिळाली. जयश्री पाटिल या 4 हजार 204 मतांनी विजयी झाल्या.

पाडळदा गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे शेवाळे मोहनसिंग पवनसिंग यांना 4 हजार 803 मते मिळाली. कॅमुनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे पाटील ईश्वर मदन याना 3 हजार 80 मते मिळाली. तर भाजपचे पाटील धनराज काशिनाथ यांना 4 हजार 274 मते मिळाली. मोहन शेवाळे हे 529 मतांनी विजयी झाले.

कहाटूळ गटात भाजपच्या ऐश्वर्या जयपाल रावल या विजयी झाल्या.

अक्कलकुवा तालुक्यात दोन गटात निवडणूक झाली.

अक्कलकुवा गटात काँग्रेसच्या सुरय्या मक्राणी विजयी झाल्या . त्यांना 3 हजार 6 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी वैशाली कपिलदेव चौधरी याना 1 हजार 457 मते मिळाली. मक्राणी या 1 हजर 643 मतांनी विजयी झाल्या.

खापर गटात काँग्रेसच्या गीता पाडवी या विजयी झाल्या. त्यांना 6 हजार 597 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे नागेश दिलवरसिंग पाडवी यांना 4 हजार 931 मते मिळाली. गीता पाडवी या 1 हजार 666 मतांनी विजयी झाल्या.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या