Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानारायण राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

नारायण राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई | Mumbai

काल झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला भाजपा खासदार नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरेंच्या कालच्या भाषणात कसलाही ताळमेळ नव्हता, शिवराळ भाषेत ते बरळले. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपदाची आब राखली. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद भूषवण्याच्या लायकीचे नाहीत, असा हल्लाबोल भाजप खासदार नारायण राणे यांनी केला आहे.

- Advertisement -

तसेच “४७ शिवसैनिकांच्या भव्य मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाषण केलं. त्यांच्या भाषणात कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, कोणत्याही योजना, करोनाचं संकट याबाबत काहीही भाष्य उद्धव ठाकरे यांनी केलं नाही. मुख्यमंत्र्यांना काय बोलावं कसं बोलावं हे अजून कळत नाही. मुख्यमंत्री पदासाठी हा माणूस लायकच नाही असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. करोनामुळे महाराष्ट्रात ४३ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याला जबाबदार कोण? असाही प्रश्न नारायण राणे यांनी विचारलं आहे.

राज्यात केलेल्या कोणत्याही कामाचा त्यांनी कालच्या भाषणात उल्लेख नाही. त्यांनी कालच्या भाषणात ना शेतकऱ्याचा उल्लेख केला, ना राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल ते बोलले. कोरोनावर तर ते बोललेही नाही. देशातील सर्वात जास्त 43 हजार रुग्णांचा मृत्यू झाला. इतके रुग्ण मृत्यूमुखी पडले. याची जबबादारी मुख्यमंत्र्यांची नाही का?, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.

महाराष्ट्राशी बेईमानी करुन हा माणूस मुख्यमंत्री झाला. ५६ जागा मिळाल्या तरीही मुख्यमंत्री झालात कारण सेक्युलर पक्षांशी हातमिळवणी केली. मोदींचं नाव घेऊन निवडणूक जिंकली आणि सेक्युलर पक्षांशी हातमिळवणी केली. सुशांतप्रकरणी स्वतःच्या मुलाला क्लिन चीट दिली. मात्र सुशांतने आत्महत्या केलेली नाही. सुशांतचा खूनच झाला आहे याप्रकरणी एक दिवस आदित्य ठाकरे तुरुंगात जाणार आहे. मला आणि माझ्या मुलांना बेडुक म्हणतो हा माणूस? हा माणूस पुळचट आहे अशीही टीका नारायण राणे यांनी केली. मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो, आमच्यासारख्या शिवसैनिकांनी त्यावेळी शिवसेना उभी केली. केसेस आम्ही अंगावर घेतल्या, स्वतःला वाघ म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी कुणाला कानाखाली तरी दिली आहे का? काल दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेलं भाषण शिवराळ होती. एका मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. वाघाची भाषा करणारा हा शेळपट माणूस आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या