Friday, May 3, 2024
Homeनगर‘मुळा’च्या पाण्यावरील हक्क अबाधित राहण्यासाठी मागणी अर्ज भरा - नरेंद्र घुले

‘मुळा’च्या पाण्यावरील हक्क अबाधित राहण्यासाठी मागणी अर्ज भरा – नरेंद्र घुले

भेंडा |वार्ताहर| Bhenda

मुळा धरणाचे पाणी हेड टू टेल मिळाले पाहिजे.शेतकर्‍यांची मागणीच नसेल तर धरणात पाणी शिल्लक दिसते मग ते एमआयडीसी

- Advertisement -

आणि पिण्याच्या पाण्याचे नावाखाली दुसरीकडे वळविले जाते. तेंव्हा आपल्याला कायमस्वरूपी पाणी मिळावे आणि मुळा धरणाच्या पाण्यावरील आपला हक्क अबाधित ठेवण्यासाठी पाणी मागणी अर्ज भरा असे आवाहन लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी केले.

भेंडा बुद्रुक येथे नागेबाबा परिवाराचे वतीनेआयोजित केलेल्या ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष-उपाध्यक्ष,भेंडा ग्रामपंचायतीचे सरपंच-उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार व फुलारी वस्ती ते साबळे वस्ती रस्ता खडीकरण-डांबरीकरण कामाचे भूमीपूजन मार्गदर्शन करतांना श्री.घुले बोलत होते.

ज्ञानेश्वरचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, संचालक काकासाहेब शिंदे, शिवाजी कोलते,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे, तुकाराम मिसाळ, अंकुश महाराज कादे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री.घुले पुढे म्हणाले, कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यात सर्वांचेच योगदान आहे. शेवटच्या मिनिटापर्यंत सगळ्यांनीच आपापल्या परीने प्रयत्न केले. कुठलाही पक्ष अभिनिवेश न ठेवता विरोधकांनीसुद्धा आपल्या शब्दाला मान दिला. निवडणूका येतात जातात पण रस्ते,वीज आणि पाणी हे शेतकर्‍यांना पुढे घेऊन जाणारे प्रश्न आहेत.

ती आपल्याला करायची आहेत.जिल्हा परिषद सदस्य दत्तूभाऊ काळे यांनी दिलेल्या रस्त्याचे कामाचा शुभारंभ आपण केला. पंचायत राज हा ग्रामविकासाचा कणा आहे. सर्वांनी एकोप्याने राहावे.भेंडा ग्रामपंचायतीच्या आदर्श गाव पुरस्कारांची या पुढे ही अशीच चालत राहावी. नागेबाबांच्या पुण्यभूमीत चंद्रशेखर घुले पाटील यांच्या प्रयत्नाने ग्रामीण रुग्णालय मंजूर झालेले आहे, त्याची वस्तू सुद्धा लवकरच उभी राहील.

15 मार्च पासून मुळा उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू होणार आहे.ना.शंकरराव गडाख यांचे लक्ष असल्याने सध्या सुरू असलेले आर्वतन व्यवस्थित पार पडले. परंतु भविष्यात आपल्याला पाटपाण्याबाबद जागरूक राहिले पाहिजे, आपल्या हक्काचे पाणी दुसरीकडे जाऊ नये यासाठी सर्वांनी पाणी मागणी अर्ज भरून मागणी नोंदविली पाहिजे. माजी आमदार पांडुरंग अभंग यांनीही मनोगत व्यक्त केले.

समता पतसंस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव अभंग, ज्ञानेश्वरच्या संचालिका रत्नमाला नवले, लताताई मिसाळ, सरपंचवैशाली शिंदे, उपसरपंच दादासाहेब गजरे, कुकाण्याच्या सरपंचलताबाई अभंग, उपाध्यक्ष अशोकराव मिसाळ, गणेश गव्हाणे, अशोक वायकर, नामदेव शिंदे, अंबादास गोंडे यांचेसह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. डॉ.शिवाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सविता नवले यांनी सूत्रसंचालन केले.संजय मनवेलिकर यांनी आभार मानले.

साखरेचा किमान विक्री दर 3300 होण्याची गरज

ऊस दर आणि साखरेचे भावाबद्दल बोलतांना श्री.नरेंद्र घुले म्हणाले,सध्या साखरेला मिळणार्‍या प्रतिक्विंटल 3100 दरामध्ये ऊसाची एफआरपी भाव,ऊस तोडणी-वाहतूक खर्च,साखरेचा उत्पादन खर्च,बँकेचे व्याज देणे सुद्धा मुस्किल होत आहे. त्यामुळे साखरेचा किमान विक्री दर प्रतिक्विंटल 3300 रुपये होणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या