Thursday, March 13, 2025
Homeदेश विदेशNarendra Modi: "इतिहास सांगतो की कुठलेही तंत्रज्ञान नोकरी घेत नाही"; PM मोदींची...

Narendra Modi: “इतिहास सांगतो की कुठलेही तंत्रज्ञान नोकरी घेत नाही”; PM मोदींची AI समिटमध्ये स्पष्टोक्ती

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पॅरिसमध्ये सुरू असलेल्या एआय परिषदेत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली. भारत आपल्या लार्ज लँग्वेज मॉडेल (मोठ्या भाषिक प्रतिमान) काम करत आहे. त्याचबरोबर एआयवर आधारित ज्ञानाचा पूल तयार करत आहे, असे मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी AI समिटमध्ये भाषण केले.

आरोग्य, शिक्षण, शेतीसह विविध क्षेत्रात बरीच सुधारून एआय ( कृत्रिम प्रज्ञा) लाखो लोकांचे जीवन बदलण्यास मदत करू शकते. या माध्‍यमातून शाश्वत विकास उद्दिष्टांचा प्रवास सोपा आणि जलद होईल. मात्र यासाठी आपण संसाधने आणि प्रतिभा एकत्र आणल्या पाहिजेत. त्‍याचबरोबर विश्वास आणि पारदर्शकता वाढवणाऱ्या ओपन-सोर्स सिस्टम विकसित केल्या पाहिजेत. आपण पक्षपातीपणापासून मुक्त दर्जेदार डेटा सेंटर्स उभारली पाहिजेत, अशी अपेक्षा व्‍यक्‍त करत नोकऱ्या कमी होणे हे एआयमधील सर्वात विनाशकारी व्यत्यय आहे; परंतु इतिहासाने हे दाखवून दिले आहे की, तंत्रज्ञानामुळे रोजगार नाहीसे होत नाहीत, फक्त त्याचे स्वरूप बदलते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. ११) स्‍पष्‍ट केले.

- Advertisement -

काय म्हणाले मोदी?
मोदी म्हणाले, “आज AI ही काळाची गरज आहे. आमच्याकडे जगातले सर्वात मोठे टॅलेंट आहे. आम्ही लोकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवस्था तयार केली आहे. आमचे सरकार खासगी सेक्टर्सच्या मदतीने पुढे वाटचाल करते आहे. AI चे भविष्य खूपच चांगले आहे आणि AI मुळे सगळ्यांचे हित होणार आहे.”

AI कोड फॉर ह्युमॅनिटी लिहितो आहे. AI मुळे लाखो आयुष्ये बदलणार आहेत. काळ बदलतो आहे त्याचप्रमाणे रोजगारांचे स्वरुपही बदलते आहे. कायमच चर्चा होतात की AI मुळे रोजगाराचे संकट निर्माण होऊ शकते. पण इतिहास आपल्याला हेच सांगतो की कुठलेही तंत्रज्ञान नोकऱ्या घेत नाही. AI मुळे नोकरीच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी भाषणात भारताच्या एलएलएमबद्दलही (लार्ज लँग्वेज मॉडेल) माहिती दिली. भारत लवकरच आपले लार्ज लँग्वेज मॉडेल विकसित करेल, असे ते म्हणाले.

भारताच्या एलएलएम मॉडेलची चर्चा होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही याबद्दल माहिती दिली होती. भारत लवकरच एलएलएम हे AI मॉडेल विकसित करेल, असे त्यांनी म्हटले होते.

भारताने १.४ अब्जाहून अधिक लोकांसाठी अतिशय कमी खर्चात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यशस्वीरित्या उभारल्या आहेत. अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी, प्रशासनात सुधारणा करण्यासाठी आणि देशातील जनतेचे जीवनमान बदलण्यासाठी विस्तृत काम केले आहे. भारत डेटा गोपनीयतेवर एआय स्वीकारण्यात आणि तांत्रिक-कायदेशीर उपायांमध्ये आघाडीवर असल्‍याचेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

AI च्या पॅरीसमधल्या परिषदेत १०० देशांचे राष्ट्राध्यक्ष सहभागी झाले आहेत. समाज आणि सुरक्षा या दोन घटकांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आवश्यकता आहे, असे मोदी म्हणाले. त्याचप्रमाणे इमॅन्युअल मॅक्रो यांचे त्यांनी आभारही मानले.

“भारत आपल्या विविधतेचा विचार करून स्वतःचे मोठे भाषा मॉडेल तयार करत आहे. संगणकीय संसाधनांचे एकत्रीकरण करण्यासाठी सार्वजनिक-खासगी गुंतवणुकीतील मॉडेल देखील आहे. ते आमच्या स्टार्टअप्स आणि संशोधकांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून दिले जात आहे. एआय भविष्य चांगले आणि सर्वांसाठी आहे याची खात्री करण्यासाठी भारत आपला अनुभव आणि कौशल्य सामायिक करण्यास तयार आहे. काही लोकांना काळजी आहे की, मशीन्स बुद्धिमत्तेत मानवांपेक्षा श्रेष्ठ होतील; परंतु आपल्या सामूहिक भविष्याची गुरुकिल्ली आपल्या मानवांशिवाय कोणाकडेही नाही, जबाबदारीची हीच भावना आपल्‍याला एआय विकासात मार्गदर्शन करेल, असे विश्‍वासही पंतप्रधान मोदी यांनी व्‍यक्‍त केला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...