Monday, April 6, 2026
Homeक्राईमNashik Accident News : आठ वर्षांच्या चिमुकलीला ट्रकने चिरडले

Nashik Accident News : आठ वर्षांच्या चिमुकलीला ट्रकने चिरडले

नाशिक | Nashik

सातपूर परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आज (शनिवारी) सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात आठ वर्षाच्या चिमुकलीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. तर घटनास्थळावरून ट्रक चालक पसार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, नेविका अभिषेक नेरकर (वय ८, रा. मयूर स्वीटच्या पाठीमगे, आनंदवल्ली, पाईपलाईन रोड सातपूर) असे मयत मुलीचे नाव आहे. नेविका ही आपल्या आजीसोबत दुचाकी क्रमांक (टीव्हीएस ज्युपिटर, क्रमांक एमएच १५ जेई ९१८१ ) वरून घराकडे जात होती. त्यावेळी रिलायन्स पेट्रोल पंपाजवळून जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच १७ बी.डी ५०५ याने दुचाकीला जोरात कट मारला. त्यामुळे तोल जाऊन नेविका खाली पडली आणि ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी करत सिग्नल व गतिरोधक टाकण्याची मागणी केली. तसेच घटनेनंतर पोलिसांनी अपघाताची माहिती घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्या

Shrigonda Crime : केरोसीन विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) जगभरातील युध्दजन्य परिस्थितीमुळे एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होत असताना राज्य शासनाने पर्यायी उपाय म्हणून केरोसीन वितरणाला चालना दिली आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब...