जुने नाशिक | प्रतिनिधी | Old Nashik
शहरातील वडाळा रोड (Wadala Road) येथील हाजी लॉन्स जवळ मुमताज पार्कच्या (Mumtaj Park) समोर आज (मंगळवारी) दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात (Accident) एका १६ वर्षीय कॉलेजच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुहाना शेख (वय १६, रा. नाशिक) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. सुहाना ही आपल्या दुचाकीवरून कॉलेजला जात असताना मागून भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने (Eicher Truck) (एमएच १५ जेके ७०११) तिला धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, सुहाना ट्रकच्या मागच्या चाकाखाली आली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालकाने मद्यप्राशन केलेले असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, अपघातानंतर (Accident) नागरिकांनी तात्काळ पोलिसांना (Police) माहिती दिली. यानंतर मुंबई नाका पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व आयशर ट्रकचालकाला अटक (Arrested) केली. तर अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेमुळे सुहानाच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीचा मद्यधुंद चालकामुळे झालेला मृत्यू ही अत्यंत गंभीर बाब असून, नागरिकांनीही मद्यधुंद चालकांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.





