Wednesday, February 4, 2026
HomeनाशिकNashik Accident News : डंपरच्या चाकाखाली सापडून विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, एक जखमी

Nashik Accident News : डंपरच्या चाकाखाली सापडून विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, एक जखमी

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथील एकलहरे रोडवर (Eklahare Road) कॉलेजवरून घरी जात असताना मातोश्री कॉलेजचा विद्यार्थी (Student) एकलहरे रोड येथे डंपरच्या चाकाखाली सापडून जागीच ठार (Killed) झाला. तर त्याचा एक मित्र या अपघातात जखमी झाला.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, आयुष विजय जाधव (वय २३) रा. डोंबिवली, मुंबई असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आयुष हा मातोश्री कॉलेज (Matoshri Collage) येथे शिक्षणासाठी भोर मळा येथे त्याच्या मामाकडे गेल्या चार ते पाच वर्षापासून राहत होता. आयुष हा सकाळी मातोश्री कॉलेज येथून घरी येत असताना त्याची एक्टिवा गाडी पुढे गतिरोधक असल्याने स्लिप झाली.

YouTube video player

त्यानंतर त्याच्यासोबत असणारा त्याचा मित्र (Friend) देखील एका बाजूला पडून जखमी झाला. तर आयुष हा एका मोठ्या डंपरच्या चाकाखाली आल्याने त्याचा चिरडून जागीच मृत्यू झाला. साडे अकरा ते बारा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला असून, याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

ताज्या बातम्या

Ravindra Pagar Passed Away : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार (Ravindra Pagar) यांचे अल्पशा आजाराने (आज दि.३) निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवार दि....