Wednesday, April 29, 2026
Homeक्राईमNashik Accident News : मद्यधुंद कारचालकाने तिघांना उडवले; तरुणासह दोन डिलिव्हरी बॉय...

Nashik Accident News : मद्यधुंद कारचालकाने तिघांना उडवले; तरुणासह दोन डिलिव्हरी बॉय जखमी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

त्र्यंबक रोडवर (Trimbak Road) रविवारी (दि. २९) पहाटे एका चालकाने मद्यधुंद अवस्थेत वेगात कार चालविल्याने भीषण अपघात घडला. सातपूर (Satpur) येथील आयटीआय सिग्नलजवळ भरधाव मारुती सुझुकी कारने (एमएच १५ एचवाय ५४८८) दोन मोटारसायकलींना जोरदार धडक दिली. या धडकेत डिलिव्हरी बॉयसह तीन तरुण गंभीर जखमी झाले असून, अपघातानंतरच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातने ‘व्यवसायात वृद्धी होईल’ असे सांगून उकळले तब्बल ‘इतके’ लाख; पीडितांचे एसआयटीला कॉल

रविवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास संशयित राजेंद्रसिंग हुकूमसिंग नरोका (वय ३९, रा. इंदिरानगर) हा मद्याच्या नशेत कार त्र्यंबक रोडवरून (Trimbak Road) बेदरकारपणे चालवत होता. आयटीआय सिग्नलजवळील रॉयल एनफिल्ड शोरूम समोर त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून स्वप्निल किशोर पाटील आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन डिलिव्हरी बॉय मोहन जाधव व ललित मोरे यांच्या दुचाकींना (एमएच १८ एक्यू ७०४३ व एमएच १९ एबी ६३४६) पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे हे तरुण हवेत फेकले गेले आणि गाड्यांचा चक्काचूर झाला.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : ‘नो चेक, ओन्ली कॅश’; नाशिकचा ‘एप्स्टीन’ खरातला धनादेशावर अविश्वास

फिर्यादी किशोर पंडित पाटील यांनी सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) दिलेल्या तक्रारीनुसार, राजेंद्रसिंग हा पूर्णपणे नशेच्या अमलाखाली होता, असे नमूद केले आहे. सातपूर पोलिसांनी या प्रकरणी बीएनएस व मोटार वाहन कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहीरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार किशोर बेंडकुळे तपास करत आहेत. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असली तरी, जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : नीलम गोऱ्हे देखील खरातला भेटल्या, नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेलमध्ये…; तृप्ती देसाईंच्या आरोपाने खळबळ

ताज्या बातम्या