मुंबई | Mumbai
भोंदुगिरीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरातच्या काळ्या गैरकृत्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. खरातच्या संपर्कात महिलांसह अनेक बडे राजकारणी आणि प्रसिद्ध नेते देखील आले आहेत. यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) माजी मंत्री दीपक केसरकर यांचे नाव आत्तापर्यंत अनेकवेळा समोर आले आहे. चाकणकर यांना तर या प्रकरणामुळे राज्य महिला आयोग आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला आहे. अशातच आता या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी माध्यमांशी बोलतांना विधानपरिषदेच्या उपसभापति नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातने ‘व्यवसायात वृद्धी होईल’ असे सांगून उकळले तब्बल ‘इतके’ लाख; पीडितांचे एसआयटीला कॉल
त्या म्हणाल्या की, “गेली पाच ते सहा वर्ष नीलम गोऱ्हे या भोंदू अशोक खरातकडे जात होत्या. करोनापूर्वी (Corona) त्यांनी खरातची भेट घेतली होती. त्यावेळी त्याने नीलम गोऱ्हेंचे भविष्य सांगितले होते. त्यांना विधान परिषदेवर आमदारकी (MLA) हवी होती. कदाचित गोऱ्हे यांना खरातच्या काळ्या कारवायांची माहिती नसेल, पण आता अनेक महिलांनी खरातची गैरकृत्य सांगितल्यानंतर त्यांनी खरातविरोधात आवाज का उठवला नाही? इतर वेळेस अनेक गोष्टींवर बोलतात? आपल्या भेटीची माहिती त्यांनी का दिली नाही? कारण त्यांचे खरातशी संबंध असून, त्या खरातकडे जात होत्या”, असा गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी केला.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; पोलीस कोठडी पुन्हा वाढवली, आज कोर्टात नेमकं काय घडलं? वाचा A टू Z माहिती
पुढे त्या म्हणाल्या की,”अशोक खरातच्या (Ashok Kharat) कॉलेजरोडमधील ऑफिसमध्ये नीलम गोऱ्हे यांनी मंत्रीपद मिळावं यासाठी भविष्य बघितले होते. तसेच नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या हॉटेल एक्स्प्रेस इन याठिकाणी करोनाच्या काळाच्या आधी नीलम गोऱ्हे मुक्कामाला होत्या. त्यावेळी खरात हा एक्स्प्रेस इन हॉटेलमध्ये त्यांचे भविष्य सांगण्यासाठी भेटायला गेला होता. हे प्रकरण बाहेर आल्यापासून अनेक जण या प्रकरणात बोलत नव्हते, त्यात सर्वात महत्त्वाचा चेहरा नीलम गोऱ्हेंचा होता. एरव्ही नीलम गोऱ्हे अगदी छोटी प्रकरणी असली तरी त्याबद्दल प्रेस नोट काढत त्यावर जाहीरपणे बोलतात. मात्र, आता अधिवेशनात महिलांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा गाजला तरी नीलम गोऱ्हे आत्तापर्यंत काहीच का बोलल्या नाहीत? असा सवाल देसाई यांनी विचारला.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातच्या मोबाईलचा ‘क्लोन’ तयार; बड्यांची गुपिते उघडणार, पंटरही रडारवर
नीलम गोऱ्हेंसोबतच्या व्यक्तीनेच दिली माहिती
यावेळी तृप्ती देसाई म्हणाल्या की,”अशोक खरातचे नीलम गोऱ्हे यांच्याशी संबंध आहे, त्या खरातला भविष्य दाखवायला जात होत्या. या सर्व भेटींची माहिती मला नीलम गोऱ्हे यांच्यासोबत जी व्यक्ती उपस्थित होती त्यांनीच पुण्यामध्ये येऊन दिली”, असा खुलासा त्यांनी केला.
हे देखील वाचा : Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT च्या रडारवर; चौकशीसाठी बजावले समन्स





