Thursday, March 13, 2025
HomeनाशिकNashik Accident : ट्रकची हायड्रॉ क्रेनला धडक; दोघांचा मृत्यू, ४ गंभीर

Nashik Accident : ट्रकची हायड्रॉ क्रेनला धडक; दोघांचा मृत्यू, ४ गंभीर

मनमाड | प्रतिनिधी | Manmad

येथील मनमाड-नांदगाव मार्गावर (Manmad-Nandgaon Route) ट्रकने हायड्रॉ क्रेनला जबर धडक दिल्याने भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू (Death) झाला असून ४ जण गंभीर जखमी आहेत. शिवजयंतीनिमित्त पथदीपच्या खांबावर झेंडे लावताना ही घटना घडली.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, अजय पवार आणि चार्ल्स फ्रांसिस असे अपघातात मूत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर इतर चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना मालेगावच्या सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. शिवजयंतीनिमित्त हायड्रॉ क्रेनवर चढून हे तरुण पथदीपच्या खांबावर झेंडे लावत होते.

दरम्यान, यावेळी भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकने क्रेनला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की क्रेनचे दोन भाग झाले. तसेच त्यावर चढलेले तरुण (Youth) खाली पडून त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले असून पोलिसांनी (Police) ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...