Saturday, September 12, 2026
Homeमुख्य बातम्याNashik APMC News : नाशिक बाजार समिती उपसभापतीपदी प्रल्हाद काकड

Nashik APMC News : नाशिक बाजार समिती उपसभापतीपदी प्रल्हाद काकड

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nashik APMC News) उपसभापतीपदी प्रल्हाद काकड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी उपसभापती जगन्नाथ कटाळे यांनी रोटेशन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा (Resignation) दिल्याने हे पद रिक्त झाले होते. बुधवार (ता. २०) रोजी सकाळी ११ वाजता बाजार समितीच्या कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली. “बाजार समितीच्या आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध राहू,” अशी ग्वाही नवनिर्वाचित उपसभापती काकड यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, बुधवार सकाळी साडेअकरा वाजता बाजार समितीचे सभापती व संचालक कार्यालयात दाखल झाले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा दिंडोरीचे सहायक निबंधक (सहकारी संस्था) वैभव मोरडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी दहा वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. उपसभापतीपदासाठी प्रल्हाद काकड यांचा एकमेव अर्ज आल्याने, त्यांची बिनविरोध (Unopposed) निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या निवड प्रक्रिये दरम्यान विरोधी गटातील तिन्ही संचालक मात्र अनुपस्थित होते.

याप्रसंगी बाजार समितीच्या सभापती कल्पना चुंभळे, माजी सभापती शिवाजी चुंभळे, विनायक माळेकर, संपतराव सकाळे, युवराज कोठुळे, जगन्नाथ कटाळे, तानाजी करंजकर, धनाजी पाटील, राजाराम धनवटे, भास्करराव गावित, सविता तुंगार, हमाल-मापारी प्रतिनिधी चंद्रकांत निकम, व्यापारी प्रतिनिधी संदीप पाटील व जगदीश आपसुंदे उपस्थित होते. तसेच माजी संचालक संजय तुंगार, बाजार समितीचे सचिव निवृत्ती बागुल, सहायक सचिव विजय निकम, मनोज महाले, मुख्य लिपिक शंतनु झोमन, अभियंता रामदास रहाडे, सेनेटरी इन्स्पेक्टर रवींद्र तुपे, पिंपळगाव बाजार समितीचे संचालक गोकुळ गीते, नगरसेवक प्रमोद पालवे, कमलेश बोडके, भाजप नेते बापू पिंगळे, माजी नगरसेवक पुंडलीक खोडे, दामोदर मानकर, मविप्र संचालक संजय पिंगळे यांच्यासह रघुभाऊ फडोळ, प्रकाश घुगे, सचिन पिंगळे, बाळकृष्ण हांडोरे, प्रभाकर माळोदे, जगन कुटे, मदन पिंगळे, ज्ञानेश्वर पिंगळे, प्रकाश घाडगे, समाधान बोडके, सागर विंचू, भगीरथजी गिते, मधुकर कहांडळ, प्रमोद काकड, रुपेश काकड, प्रशांत गामणे, प्रकाश सानप, शुभम चिन्ने आदी पंचक्रोशीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजिंक्य चुंभळे यांचे अचूक नियोजन

सध्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची वाटचाल सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. बुधवारच्या उपसभापती निवडीची संपूर्ण धुरा युवा नेते अजिंक्य चुंभळे यांच्या खांद्यावर होती. त्यांनी अत्यंत चोख नियोजन करत ही प्रक्रिया यशस्वीरित्या हाताळली, ज्यामुळे प्रल्हाद काकड यांची बिनविरोध निवड शक्य झाली. याकामी त्यांना युवा व तज्ज्ञ संचालक इंजिनिअर विनायक माळेकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सभापती आणि सहकारी संचालक मंडळाने माझ्यावर जो विश्वास दाखवून उपसभापती पदाची जबाबदारी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आजवर नेहमीच शेतकरी हिताची कामे केली आहेत आणि यापुढेही ती अविरत सुरू राहतील. संचालक मंडळाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी कटिबद्ध असेन.”

प्रल्हाद काकड (नवनिर्वाचित उपसभापती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती)

ताज्या बातम्या

मका प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार –...

0
नाशिक, दि. 11 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : जिमाका वृत्तसेवा चिंचोंडी औद्योगिक वसाहतीमध्ये सुखजित बायोकॉर्न लिमिटेडकडून सुमारे रूपये ७६० कोटींची गुंतवणूक असलेला अत्याधुनिक कृषी-आधारित अन्नप्रक्रिया उद्योग...