Friday, April 25, 2025
HomeनाशिकNashik Assembly Election 2024 : जिल्ह्यातील 'हे' आहेत विजयी उमेदवार; तुमचा ...

Nashik Assembly Election 2024 : जिल्ह्यातील ‘हे’ आहेत विजयी उमेदवार; तुमचा आमदार कोण?

नाशिक | Nashik

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Elections) निकाल (Result) जाहीर झाले आहेत. यात राज्याच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा महायुतीच्या (Mahayuti) हातात गेल्या आहेत. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघापैकी १५ विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांना (MLA) पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून येवला विधानसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा निवडून येण्याचा पराक्रम केला आहे. छगन भुजबळ हे २६ हजार मतांनी विजयी झाले आहेत. तर दिंडोरीतून नरहरी झिरवाळ तब्बल ४१ हजार मतांनी निवडून आले आहेत. तसेच देवळाली विधानसभा मतदारसंघातून सरोज अहिरे ४० हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. इगतपुरीतून हिरामण खोसकर ८६ हजार मतांनी निवडून आले आहेत. तसेच कळवणमधून नितीन पवार ८ हजार तर सिन्नर मतदारसंघातून माणिकराव कोकाटे ४० हजार मतांनी निवडून आले आहेत. तर निफाडमधून दिलीप काका बनकर हे २८ हजार मतांनी विजयी झाले आहेत.

तसेच महायुतीमधील भाजपकडून नाशिक पश्चिम मतदारसंघातून सीमा हिरे या ७० हजार मतांनी, नाशिक मध्यतून देवयानी फरांदे १७ हजार मतांनी, चांदवडमधून डॉ.राहुल आहेर ४८ हजार मतांनी, बागलाणमधून दिलीप बोरसे १ लाख २९ हजार ६३८ मतांनी आणि नाशिक पूर्वतून राहुल ढिकले ७० हजार मतांनी विजयी झाले आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेचे दादा भुसे हे मालेगाव बाह्य मतदारसंघातून १ लाखाहून अधिक मतांनी निवडून आले आहेत. तसेच सुहास कांदे नांदगावमधून ८० हजार मतांनी विजयी झाले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...