Friday, August 21, 2026
Homeमुख्य बातम्याNashik BJP Meeting : बूथ मजबूत करा, लढाईसाठी मैदानात उतरा - भाजप...

Nashik BJP Meeting : बूथ मजबूत करा, लढाईसाठी मैदानात उतरा – भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचा कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

लढाईची वेळ आली की शेपूट घालण्याची भूमिका चालणार नाही. पक्षाकडून प्रत्येक विषय कार्यकत्यांना दिला जाईल आणि त्यावर प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करावे लागेल, असा स्पष्ट इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी कार्यकत्यांना दिला. आगामी राजकीय आव्हानांसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अधिक आक्रमक, नियोजनबद्ध आणि जबाबदारीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.भारतीय जनता पक्षाच्या मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विभागातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक बुधवारी (दि. १९) पंचवटी येथील स्वामीनारायण बँकेट हॉल येथे झाली.

- Advertisement -

बैठकीत (BJP Meeting) पक्ष संघटना मजबूत करणे, बूथ पातळीवरील यंत्रणा सक्षम करणे आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (एसआयआर) कामाला गती देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीस भाजपचे राष्ट्रीयमहामंत्री तरुण चुग, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, एसआयआर प्रभारी भगवानदास सबनानी, एसआयआर प्रदेश संयोजक किरीट सोमय्या, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, मंत्री गिरीश महाजन, पंकजा मुंडे, मेघना बोडर्डीकर यांच्यासह आमदार, खासदार, प्रदेश पदाधिकारी, एआयआर प्रदेश व जिल्हा समिती सदस्य, विधानसभा प्रभारी तसेच बीएलए-१ श्रेणीतील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

एसआयआरच्या कामात (SIR Work) आपण नेमके कुठे कमी पडत आहोत, याचे प्रत्येक कार्यकत्यनि आत्मपरीक्षण करून त्यावर तातडीने काम करावे, असे चव्हाण यांनी सांगितले. निवडणूक जिंकण्यासाठी केवळ नेत्यांचे नियोजन किंवा मोठ्या सभा पुरेशा नसून प्रत्यक्ष बूथवर कार्यकर्त्यांची मजबूत यंत्रणा उभी करणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. नाशिकमधील २५६ बूयवर ‘एक व्यक्ती, एक बूथ’ या पद्धतीने काम करण्याचे प्रयत्न करण्यात आले असून ९४ बीएलएंची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, काही बूथवर संघटनात्मक कामकाज आणखी सक्षम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक बूथवर जबाबदार कार्यकर्ता, मतदारांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि मतदानाच्या दिवशी प्रभावी यंत्रणा उभी करण्यावर त्यांनी विशेष भर कामात दिला.

मतदारसंघातील ज्या बाबी अद्याप प्रलंबित आहेत, त्यावर तातडीने काम करण्याची गरज आहे. २४ तारखेनंतरची लढाई ही शंभर टक्के भाजपच्या कार्यकर्त्यांची आहे, असे स्पष्ट करत चव्हाण यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने (Party Workers) आपली जबाबदारी ओळखून मैदानात उतरावे, असे आवाहन केले. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी बैठकीत विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. आगामी राजकीय व संघटनात्मक कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग आणि बूथ स्तरापासून संघटना मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला. एसआयआरच्या प्रभावी अंमलबजावणीसह आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बैठकीतून स्पष्ट दिशा देण्यात आली.

विरोधासाठी विरोध नको : बोर्डीकर

मतदार यादीतील द्वार तसेच मृत व्यक्तींची नावे वगळण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया राबविली जात असून, त्यामागे कोणताही अन्य हेतू नाही. त्यामुळे या प्रक्रियेला विरोधासाठी विरोध करू नये, असे मत राज्यमंत्री मेधना साकोरे बोर्डीकर यांनी व्यक्त केले. नाशिकमध्ये भाजपच्या एसआयआर बैठकीसाठी उपस्थित असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मंत्री महाजन ‘एव्हरग्रीन’

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे कौतुक करताना ते ‘एव्हरग्रीन’ असल्याचे सांगितले. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमध्ये विविध विकासकाने सुरू आहेत. आजच्या बैठकीसह नाशिकमधील अन्य विकासकामांची माहिती पालकमंत्री महाजनच तुम्हाला देतील, असे सांगत चव्हाण यांनी पत्रकारांशी अधिक बोलणे टाळले. त्यामुळे बैठकीत चव्हाण यांच्या या मिश्किल वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली.

कॅमेऱ्यासमोर नव्हे, कॅमेऱ्याच्या मागे !

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त अनोखा प्रसंग पाहायला मिळाला, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील पत्रकार व छायाचित्रकारांशी संवाद साधत हा दिवस आगळ्या पद्धतीने साजरा केला. यावेळी त्यांनी पत्रकार छायाचित्रकारांसोबत छायाचित्र काढून आठवणीचा क्षण टिपला. विशेष म्हणजे, केवळ कॅमेऱ्यासमोर उभे न राहता महाजन यांनी स्वतः कॅमेरा हातात घेत उपस्थित छायाचित्रकारांचे छायाचित्र टिपले.

पंकजा मुंडेंचा काढता पाय

पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यक्रम संपण्यापूर्वीच, राष्ट्रगीत होण्याच्या काही वेळ अगोदर कार्यक्रमस्थळ सोडले. त्यांच्या या घाईघाईने निघून जाण्याची पदाधिकारी आणि कार्यकत्यांमध्ये चर्चा रंगली. काहींनी नाराजीही व्यक्त केली. कार्यक्रमाचा समारोप आणि राष्ट्रगीत बाकी असतानाच त्यांनी काढता पाय घेतल्याने उपस्थितांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला.

ताज्या बातम्या

मालेगावच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा; ‘मालेगाव पॅटर्न’ राज्यभर राबविण्याचा प्रयत्न करणार...

0
मालेगाव | जिमाका वृत्तसेवा Malegaon मालेगाव शहरातील शासकीय व महानगरपालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, विशेष तज्ज्ञ डॉक्टर तसेच अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे...