Tuesday, January 13, 2026
HomeनाशिकNashik BJP Politics : माजी महापौर, नगरसेवकांना भाजपाने दाखवला बाहेरचा रस्ता; तब्बल...

Nashik BJP Politics : माजी महापौर, नगरसेवकांना भाजपाने दाखवला बाहेरचा रस्ता; तब्बल ‘इतक्या’ जणांची केली हकालपट्टी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भारतीय जनता पक्ष हा शिस्त, संघटनात्मक निष्ठा आणि ध्येय धोरणांवर ठाम विश्वास ठेवणारा पक्ष आहे. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या (Candidate) विरोधात काम करणे, पक्षशिस्त मोडणे तसेच अपक्ष किंवा इतर पक्षांकडून निवडणूक लढवणे ही बाब पक्षाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात असल्याने माजी महापौर, माजी सभागृहनेते, माजी नगरसेवक तसेच आजी माजी पदाधिकाऱ्यांसह ६० हून अधिक जणांची हकालपट्टी करण्यात आल्याचे शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांनी कळविले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik MC Election : नाशकात ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले; ‘आप’च्या उमेदवारावर ताणली बंदूक!

YouTube video player

भाजप पक्षश्रेष्ठींच्या स्पष्ट निर्देशानुसार नाशिक महानगरपालिका निवडणुकीत (Nashik Municipal Coroporation Election) पक्षाच्या विरोधात जाऊन काम व करणाऱ्या तसेच इतर पक्षांकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. सदर संबंधित व्यक्तींना भारतीय जनता पार्टीमधून तात्काळ हकालपट्टी करण्यात येत आहे अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, केदार पुढे म्हणाले की भारतीय जनता पार्टीमध्ये (BJP) वैयक्तिक हितापेक्षा संघटन आणि पक्षाचे हित सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. पक्षाने दिलेल्या उमेदवारांच्या विरो-धात काम करणे किंवा पक्षशिस्त मोडणे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. ही कारवाई म्हणजे भविष्यातील निवडणुकांमध्ये शिस्त, एकजूट आणि संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्यासाठी उचललेले ठोस पाऊल आहे.

हे देखील वाचा : Nashik News : चौक सभेदरम्यान मंत्री महाजनांशी बाचाबाची

यांची झाली हकालपट्टी

कमलेश बोडके, अमित घुगे, सतीश (बापू) सोनवणे, पुनम सोनवणे, रुची कुंभारकर, अशोक मुर्तडक, सुनीता पिंगळे, शशिकांत जाधव, मिरा हांडगे, अंबादास पगारे, अलका अहिरे, मुकेश शहाणे, पंडित आवारे, राजेश आढाव, अनिल मटाले, जितेंद्र चोरडीया, सचिन मोरे, ज्ञानेश्वर काकड, ज्ञानेश्वर पिंगळे, चारुदत्त आहेर, बाळासाहेब पाटील, तुषार जोशी, सचिन हांडगे, प्रकाश दिक्षीत, दामोदर मानकर, रतन काळे, ऋषिकेश आहेर, ऋषिकेश डापसे, जहागीरदार नवाबखान, कैलास अहिरे, सतनाम राजपुत, गणेश मोरे, किरण गाडे, संदीप (अमोल) पाटील, मंगेश मोरे, शालिग्राम ठाकूर, कल्पेश ठाकूर, मनोज तांबे, शरद शिंदे, शरद इंगळे, प्रभा काठे, स्मिता बोडके, योगीता राऊत, अनंत औटे, अॅड. मिलिंद मोरे, राजश्री जाधव, साक्षी गवळी, चंचल साबळे, यमुना घुगे, बाळासाहेब घुगे, शिला भागवत, शंकर विधाते, प्रेम पाटील, राहत बेगम अहमद रजा काझी, वंदना मनचंदा, रत्ना सातभाई, यमुना वराडे, संजय गायकवाड, ऋषिकेश शिरसाठ, गीता वाघमारे, गुलाब माळी, सविता गायकर, नंदिनी जाधव, राहुल कोथमिरे, प्रमिला मैंद, शीतल साळवे, कन्हैया साळवे, तुळशी मरसाळे, तुषार सोळुंखे, दिलीप दातीर, शिला भागवत, तुळशिराम भागवत, सागर देशमुख, सोनाली नवले, एकनाथ नवले यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “मुख्यमंत्र्यांना इतके हिंदीचे प्रेम असेल तर त्यांनी…”; संजय...

0
मुंबई । Mumbai शिवेसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षावर तिखट शब्दांत टीका केली आहे. "महाराष्ट्रात...