नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक महानगरपालिका निवडणुकीत (Nashik NMC Election) पक्षाच्या विरोधात जाऊन काम करणाऱ्या तसेच इतर पक्षांकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर (Party Workers) कडक शिस्तभंगाची कारवाई करुन दोन महिने होत नाही तोच आता त्यांच्या घरवापसीची तयारी सुरु झाली आहे.
भारतीय जनता पार्टी (BJP) ही शिस्त, संघटनात्मक निष्ठा आणि ध्येयधोरणांवर ठाम विश्वास ठेवणारा पक्ष आहे. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम करणे, पक्षशिस्त मोडणे, तसेच अपक्ष किंवा इतर पक्षांकडून निवडणूक लढवणे ही बाब पक्षाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात असल्यामुळे गेल्या जानेवारी महिन्यात भाजप पक्ष श्रेष्ठींच्या निर्देशानुसार संबंधित व्यक्तींची भारतीय जनता पार्टीमधून शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांनी तात्काळ हकालपट्टी केली होती.
तेव्हा केदार यांनी, भारतीय जनता पार्टीमध्ये वैयक्तिक हितापेक्षा संघटन आणि पक्षाचे हित सर्वात जास्त व निष्ठावान मनोबल महत्त्वाचे आहे. पक्षाने दिलेल्या उमेदवारांच्या (Candidate) विरोधात काम करणे किंवा पक्षशिस्त मोडणे कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही अशा कारवायांमुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांचे वाढेल, तसेच पक्ष विरोधी भूमिका घेणार्यांना ठाम संदेश जाईल, असे म्हटले होते. दरम्यान त्यानंतर आता हकालपट्टी झालेल्या किती जणांची घरवापसी होते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
कोणाची झाली होती हकालपट्टी
कमलेश बोडके, अमित घुगे, सतीश (बापू) सोनवणे, पुनम सोनवणे, रुची कुंभारकर, अशोक मुर्तडक, सुनीता पिंगळे, शशिकांत जाधव, मिरा हांडगे, अंबादास पगारे, अलका अहिरे, मुकेश शहाणे, पंडित आवारे, राजेश आढाव, अनिल मटाले, जितेंद्र चोरडीया, सचिन मोरे, ज्ञानेश्वर काकड, ज्ञानेश्वर पिंगळे, चारुदत्त आहेर, बाळासाहेब पाटील, तुषार जोशी, सचिन हांडगे, प्रकाश दीक्षित, दामोदर मानकर, रतन काळे, ऋषिकेश आहेर, ऋषिकेश डापसे, जहागीरदार नवाबखान, कैलास अहिरे, सतनाम राजपुत, गणेश मोरे, किरण गाडे, संदीप (अमोल) पाटील, मंगेश मोरे, शालीग्राम ठाकूर, कल्पेश ठाकूर, शरद शिंदे, शरद इंगळे, प्रभा काठे, स्मिता बोडके, योगीता राऊत, अनंत औटे, मिलिंद मोरे, राजश्री जाधव, साक्षी गवळी, मनोज चंचल साबळे, यमुना घुगे, बाळासाहेब घुगे, शिला भागवत, शंकर विधाते, प्रेम पाटील, राहत बेगम, अहमद रजा काझी, वंदना मनचंदा, रत्ना सातभाई, यमुना वराडे, संजय गायकवाड, ऋषिकेश शिरसाठ, गीता वाघमारे, गुलाब माळी, सविता गायकर, नंदिनी जाधव, राहुल कोथमिरे, प्रमिला मैंद, शीतल साळवे, कन्हैयासाळवे, तुळशी मरसाळे, तुषार सोळुंखे, दिलीप दातीर, शिला भागवत, तुळशिराम भागवत, सागर देशमुख, सोनाली नवले, एकनाथ नवले यांचा समावेश होता.
कोण परत येणार याकडे लक्ष
यंदा नववर्षाच्या सुरुवातीलाच नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत असंतोष आणि बंडखोरी उफाळून आली होती. उमेदवारी अर्ज भरताना एबी फॉर्म वाटपावरून भाजपमध्ये मोठा राडा झाला. जुन्या निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्यांना तिकीट दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती, ज्यामुळे अनेक प्रभागांत बंडखोरी झाली. ५४ हून अधिक जणांची हकालपट्टी झाली. पक्षादेश झुगारून निवडणूक लढविणाऱ्या माजी महापौरांसह ५४ पेक्षा जास्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर भाजपने कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. अनेक वेळा समज देऊन सुध्दा सतत भाजपच्या ध्येयधोरणा विरोधी भूमिका घेत असल्यामुळे नाशिकरोड येथील भाजपचे बुद्धिजीवी प्रकोष्टचे महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक रोहन देशपांडे यांची पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने शिस्तभंग समितीच्या अहवालानुसार मुकेश दिलीप शहाणे यांची पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी माजी नगरसेविका अलका अहिरे व भाजपचे माजी पदाधिकारी कैलास अहिरे यांची भारतीय जनता पार्टीमधून ६ वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर नाशिकरोडला अध्यक्षांना गाजर दिले होते. आत तेही पक्षात घेणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.





