Sunday, February 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Car Fire : मुंबई-नाशिक महामार्गावर भाजप खासदाराची रेंज रोव्हर जळून खाक;...

Nashik Car Fire : मुंबई-नाशिक महामार्गावर भाजप खासदाराची रेंज रोव्हर जळून खाक; कुटुंब थोडक्यात बचावले

नाशिक | Nashik

मुंबई–नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik Highway) शुक्रवारी मध्यरात्री भाजप आमदाराच्या रेंज रोव्हर गाडीला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत सुमारे चार कोटी रुपये किमतीची कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवतहानी झालेली नसून, घटनास्थळी गाडीचा अक्षरशः सांगाडाच उरला होता.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, राजस्थानमधील (Rajasthan) जालोर–सिरोही मतदारसंघाचे भाजप खासदार लुंबा रामजी चौधरी (BJP MP Lumba Ramji Chaudhary) हे त्यांच्या महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे दर्शनासाठी येत होते. सदर गाडी शहापूर येथील चालक अनिल बबन जाधव (वय ४०) हे चालवत होते. रेंज रोव्हर गाडी वाडीवऱ्हे जवळील गोंदे फाटा परिसरातील औद्योगिक वसाहतीजवळ आली असता चालकाला अचानक गाडीतून काही तरी जळाल्याचा वास आला. यावेळी चालकाने बघितले असता इंजिनमधून धूर निघत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

YouTube video player

दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालक जाधव यांनी तातडीने गाडी रस्त्याच्या कडेला उभी करत खासदार चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गाडीतून (Car) बाहेर उतरण्याचे विनंती केली. यानंतर सर्व प्रवाशी गाडीतून खाली उतरले त्यामुळे सगळेजण बचावले. त्यानंतर काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने गाडीचा कोळसा झाला. या घटनेमुळे काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती.

ताज्या बातम्या