Monday, May 4, 2026
Homeमुख्य बातम्याHarshwardhan Sapkal : 'ध' चा 'मा' करून देवेंद्र फडणवीसांना राज्यात दंगली...; पुण्यातील...

Harshwardhan Sapkal : ‘ध’ चा ‘मा’ करून देवेंद्र फडणवीसांना राज्यात दंगली…; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर सपकाळांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई | Mumbai

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सपकाळ यांच्या वक्तव्याचा भाजपकडून (BJP) निषेध करण्यात येत असून, आज (रविवारी) राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. तर पुण्यात आंदोलनादरम्यान भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यामुळे राडा झाला. त्यानंतर आता या राड्यावर सपकाळ यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik BJP News : आमदार फरांदेंच्या नेतृत्वात भाजप युवा मोर्चाचे काँग्रेस कमिटीसमोर आंदोलन; ‘त्या’ विधानावरून हर्षवर्धन सपकाळांना दिला इशारा

हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर (Facebook Account) एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, “माझ्या वक्तव्याची मोडतोड करून “ध” चा “मा” करून देवेंद्र फडणविसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत असे मी सांगितले होते, त्याचा प्रत्यय आज पुण्यात आला. पुण्यातील (Pune) भाजपचे गुंड पुणे काँग्रेसच्या कार्यालयावर चाल करून आले व त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत दगडफेक करत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांसह पत्रकार भगिनींवर प्राणघातक हल्ला केला. भाजपच्या या गुंडगिरीचा आम्ही तीव्र निषेध करतो. पुणे पोलिसांनी दंगलखोर भाजप गुंडांना चिथावणी देणार्‍या धीरज घाटे आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह भाजपच्या दंगलखोरांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जात-धर्म आणणे हा भाजपचा जुना फंडा

प्रत्येक बाबतीत जात आणि प्रत्येक बाबतीत धर्म आणणे हा भारतीय जनता पक्षाचा हा जुना फंडा आहे आणि या फंड्याच्या अनुषंगाने या माझ्या केलेल्या एका जबाबदारी पूर्ण वक्तव्याला ते हिंदू मुस्लिम या अँगलमधून त्याला खतपाणी घालत आहे त्यांना मला माफी मागण्याच्या अनुषंगाने त्यांची जी भूमिका आहे ती माफी वीरांच्या पक्षाचे असल्यामुळे आहे. माझं वक्तव्य प्रश्नाचे अनुषंगाने बघितलं तर त्यात शिवाजी महाराजांचा आमचा जो स्वाभिमान आहे अभिमान त्यात अधोरेखित केला होता. टिपू सुलतानच्या अनुषंगाने गरळ ओकत असल्याच्या सांगायचं आहे की नुकत्याच महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत टिपू सुलतानचे फोटो आपल्या घोषणापत्र होते आपले बॅनर पोस्टर जे होते भाजपने सरसकट टिपू सुलतानचा फोटो आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी वापरला तुम्हाला प्रचारामध्ये टिपू सुलतानचा फोटो चालतो आणि आता टिपू सुलतानबद्दल आपण आपली भूमिका कुठे गेली होती हाही प्रश्न या निमित्ताने उलट पक्षी मला भारतीय जनता पक्षाला विचारायचा आहे आज याचा एक मुद्दा म्हणून काही काँग्रेस पक्षाच्या पक्ष कार्यालयावर मोर्चा आणण्याच्या अनुषंगाने देखील कुठेतरी भारतीय जनता पक्ष हा सक्रिय करतात माझे पुतळे देखील ते जाळणार आहेत अशी देखील माहिती मला प्राप्त होत आहे असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले

पुण्यातील काँग्रेस भवन समोर भाजप कार्यकर्त्यांकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात आंदोलन केले जात होते. या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसकडून सपकाळ यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनादरम्यान दगडफेक झाल्याने एका महिला पोलीस कर्मचार्‍यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे डोके फुटले. तसेच कारच्या देखील काचा फोडण्यात आल्या. तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आम्ही दगडफेक केली नसल्याचे म्हटले. उलट दगड मारण्यास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच सुरुवात केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने स्वताच्या डोक्यात दगड मारून घेतला असावा असेही म्हटले. तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना अटक करण्याची मागणी केली.

हे देखील वाचा : Maharashtra News : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या ‘त्या’ विधानावरून वाद पेटला; राज्यभरात भाजपकडून ठिकठिकाणी आंदोलन

सपकाळांनी त्या विधानावर दिले स्पष्टीकरण

काल पत्रकारांनी मला प्रश्न विचारत असताना विचारले की, “महामानवांचे आणि विशेष करून शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचे जे छायाचित्रे प्रतिमा आहेत या कार्यालयामध्ये लावण्यात याव्या अशी मागणी होत आहे याकडे आपण कसे बघता, या प्रश्नाच्या उत्तरा दाखल माझं जे उत्तर होतं ते शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा विचार दिला आणि त्याच आदर्श हा टिपू सुलताननी घेतला आणि टिपू सुलताननी तो आदर्श घेऊन इंग्रजांच्या विरोधात ते लढले आणि त्या अनुषंगाने या प्रतिमा ज्या आहेत त्यासोबत लागण्याच्या अनुषंगाने समकक्षतेच्या अनुषंगाने माझे वक्तव्य केलेले आहे. शिवाजी महाराजांचा पराक्रम आहे तो अद्वितीय हे यापूर्वी सांगितले आणि या माझ्या प्रश्नाच्या प्रश्नाला दाबून कुठे तरी जे वक्तव्य चालवण्यात येत आहे हे भारतीय जनता पक्षाचा हा खोडसाळपणा आहे. मुळात जो तथाकथित वाद जो निर्माण झालेला आहे आणि याला माझ्या वक्तव्याच्या अनुषंगाने जी भाजप गरळ ओकते आहे त्यांना मला स्पष्ट शब्दांमध्ये शिवाजी महाराज आपल्याकडून शिकण्याची आवश्यकता नाही हे या ठिकाणी अत्यंत विनम्रतेने आणि तेवढ्याच स्वाभिमानाने या ठिकाणी सांगू इच्छितो की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची आमची काँग्रेसची आन-बान शान आहे त्यांचा पराक्रम अद्वितीय आहे आणि त्यांच्या पराक्रमाच्या अनुषंगाने हिंदवी स्वराज्य निर्माण झाले आणि त्या स्वराज्याची प्रेरणा थेट स्वरूपामध्ये आपल्या संविधानापर्यंत आहे, असे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

ममता

West Bengal Legislative Election 2026: पश्चिम बंगालमध्ये भाजपची जोरदार मुसंडी; टीएमसीच्या...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiसंपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये अखेर 15 वर्षांनंतर चित्र पालटले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का देत भाजपने...