Friday, May 3, 2024
Homeनाशिककोरोना रूग्ण आढळून आल्यानंतर चांदवड सील; तीन किमी कंटेनमेंट परिसर तर पाच...

कोरोना रूग्ण आढळून आल्यानंतर चांदवड सील; तीन किमी कंटेनमेंट परिसर तर पाच किमी बफर झोन

सर्व फोटो : पिंटू राऊत, चांदवड

नाशिक | प्रतिनिधी 

- Advertisement -

मालेगावमध्ये काल (दि.०९) रोजी आणखी पाच रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहे. यातील एक रुग्ण चांदवड शहरातील असल्यामुळे प्रशासनाने चांदवडमध्ये १०० टक्के लॉकडाऊन केले आहे. साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार रुग्ण राहत असलेला परिसर केंद्रस्थानी मानून आजूबाजूचा तीन किमी परिसर कंटेनमेंट (अटकाव) परिसर तर पाच किमीचा बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी एका आदेशान्वये दिली आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून परिसरातील रहिवाशांची तपासणी करण्यात येत आहे. शहरात मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा कंटेमेंट परिसरात सुरु असतील, पण यासाठी ठराविक ठिकाणी संपर्क करून घेता येणार आहेत. तर बफर झोनमध्ये बाहेरील कुन्हीही आत येऊ शकत नाही किंवा कुन्हीही आतली व्यक्त बाहेर जाऊ शकत नाही.

वरील दोन्ही झोन मध्ये अत्यावश्यक सेवा जसे भाजीपाला किराणा सशुल्क नगरपालिकेकडून योग्य ती दक्षता घेऊन नागरिकांना पुरविण्यात येणार आहेत.

या परिसरासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून ५०-५० घरांमधील रहिवाशांचे सर्व्हेक्षण करून याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येणार आहे.

यादरम्यान, सर्दी खोकला, ताप, घसा खवखवणे अशी लक्षणे असलेल्या नागरिकांचे नमुने घेतले जाणार आहेत. होम क्वारंटाईन तसेच संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्या रुग्णांचा १४ दिवस आरोग्य विभाग लक्ष   ठेवून असेल तर २८ दिवसांपर्यंत रुग्णाचा पाठपुरावा करण्यात यावा याबाबतच्या सूचना देण्यात आल्या   आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या