Thursday, March 13, 2025
Homeक्राईमNashik News : एक लाख २० हजार बेशिस्त चालकांवर कारवाई

Nashik News : एक लाख २० हजार बेशिस्त चालकांवर कारवाई

ई-चलानचे आठ कोटी रुपये थकित, ८८ टक्के वसुलीचे आव्हान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील बेशिस्त वाहनचालकांना (Reckless Driver) शिस्त लागावी, यासाठी शहर वाहतूक पोलिसांतर्फे बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते, त्यानुसार जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीत शहरात एक लाख २० हजार २१७ बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे. ई-चालानमार्फत केलेल्या कारवाईतून या चालकांना नऊ कोटी २३ लाख ३८ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यापैकी अवघे १ कोटी ५ लाख ५० हजार ५५० रुपयांचा दंड वसूल झाला असून उर्वरित ८८ टक्के दंडवसुली (Penalties) पेंडिंग आहे.

- Advertisement -

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने अपघात व अपघाती मृत्यूचे (Accidental Death) प्रमाण वाढत असते. चालू वर्षात शहरात नोव्हेंबरअखेरपर्यंत ४५८ अपघात झाले असून त्यात १५९ जणांचा मृत्यू झाला तर ४२२ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन चालकांनी केले पाहिजे, यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे.

तसेच चालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती व प्रबोधन केले जाते. वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबरअखेरपर्यंत एक लाख २० हजार २१७ बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यापैकी १२,४८१ चालकांनी एक कोटी पाच लाख ५० हजार ५५० रुपयांचा दंड भरला आहे, तर एक लाख सात हजार ७३६ चालकांची आठ कोटी १७ लाख ८७ हजार ८५० रुपयांची दंडवसुली अद्याप प्रलंबित आहे.

आठ कोटींची दंडवसुली बाकीच

लोकअदालतील ई-चालानमार्फत दंड केल्यानंतर दंडवसुलीसाठी वाहतूक पोलीस संबंधित वाहनचालकास दंड भरण्यासाठी नोटीस पाठवतात. तसेच लोकअदालतीतही त्यांचे प्रकरण पाठवले जाते. त्यानुसार तेथे दंडवसुली केली जाते. तसेच काही वाहनचालकांना एकापेक्षा जास्त वेळेस दंड आकारल्यास त्यांचे वाहन ताब्यात घेऊन दंडवसुलीसाठी वाहतूक पोलीस प्रयत्न करतात. मात्र आता ९ कोटी २३ लाख ३८ हजार ४०० रुपयांच्या दंडापैकी अवघे १ कोटी ५ लाख ५० हजार ५५० रुपयांचा दंड वसूल झाला असून तब्बल आठ कोटी रुपयांची दंडवसुली बाकीच आहे.

वर्षनिहाय बेशिस्त चालकांवरील कारवाई

वर्ष दंड वसुली प्रलंबित दंड कारवाई दंड रुपये
२०२१ १,१२,५३२ ५,३९,४८, ४५० ९८,४०९ ४,६३,११,६००
२०२२ ८१,२३३ ७,०७,२१, १०० ७१,६८९ ७,१०,९७,२५०
२०२३ ४९,५७८ ४,३६,६०,६५० १,८१,६९० १३,९९,९०,१००
२०२४ १२,४८१ १,०५,५०,५० १ ,०७,७३६ ८,१७,८७,८५०
YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...