Saturday, September 26, 2026
Homeक्राईमCrime News : सारसनगर परिसरात तरूणाला मारहाण करत लुटले

Crime News : सारसनगर परिसरात तरूणाला मारहाण करत लुटले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पैसे उसने देण्यास नकार दिल्याने एका तरूणाला दारूच्या नशेत शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. तरूणाच्या खिशातील रोकड आणि मोबाईल जबरदस्तीने काढून घेत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सारसनगर येथील यश अपार्टमेंटसमोरील पुलाजवळ सोमवारी (18 मे) घडली असून, या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मंगळवारी (19 मे) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

- Advertisement -

शुभम अनिल हराळ (वय 26 रा. मधुबन कॉलनी, चिपाडे मळा, सारसनगर) असे जखमी तरूणाचे नाव असून त्यांनी फिर्याद दिली आहे. मयुर छबुराव कांडेकर (रा. सारसनगर), गोट्या रासकर (पूर्ण नाव माहिती नाही, रा. सारसनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम हे सारसनगर भागातून जात असताना दोन्ही संशयित आरोपी दारू पिऊन त्या ठिकाणी आले. तू बरेच दिवस झाले मला भेटला नाही असे म्हणून मयुर याने शुभमकडे दोन हजार रूपये उसने मागितले.

शुभमने माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगताच आरोपींचा पारा चढला. पैसे न दिल्याच्या रागातून आरोपींनी शुभमला शिवीगाळ केली. त्यानंतर मयुर याने हातातील लाकडी दांडक्याने शुभमवर हल्ला केला, तर त्याचा साथीदार गोट्या रासकर याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपी मयुर याने शुभमच्या खिशातील दोन हजार रूपयांची रोकड आणि मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. या घटनेबाबत जर कोणाला सांगितले, तर तुला जिवे मारून टाकीन अशी धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Drought : राज्यातील ७५ टक्के भागात दुष्काळ; तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या...

0
मुंबई | Mumbai राज्यात पावसाच्या (Rain) मोठ्या ओढीमुळे निर्माण झालेल्या गंभीर टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. सन २०२६ च्या खरीप हंगामात...