Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनाशिक : जिल्हाधिकार्‍यांचा इशारा; तबलिगींनी स्वतः माहिती दयावी अन्यथा गुन्हे दाखल करणार

नाशिक : जिल्हाधिकार्‍यांचा इशारा; तबलिगींनी स्वतः माहिती दयावी अन्यथा गुन्हे दाखल करणार

नाशिक । प्रतिनिधी

दिल्ली येथील तबलिकिच्या धार्मिक सोहळ्यास जिल्ह्यातील जे लोक गेले असतील त्यांनी स्वत:हून जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेला याबाबत माहिती द्यावी. तसेच जे लोक तबलिकींच्या संपर्कात आले असतील त्यांनी देखील प्रशासनाला माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

- Advertisement -

जर, याबाबत माहिती लपविल्याचे निदर्शनास आल्यास करोना संसर्ग पसरविल्या प्रकरणी संबधितांवर गुन्हे दाखल केले जाईल, असा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.

करोना व्हायरस तिसर्‍या टप्प्यात असून त्याचि प्रादुर्भाव वेगाने वाढण्याची चिन्हे आहेत. लाॅकडाऊनमध्ये जिल्हा व आरोग्य प्रशासन यांच्या उपाय योजना व नाशिककरांनी केलेले सहकार्य यामुळे जिल्ह्यात करोना बाधित एकच रुग्ण असून संसर्गाची साखळी तोडण्यात यश आले आहे.

मात्र, तबलिकिच्या दिल्ली येथे झालेल्या धार्मिक सोहळयात सहभागी झालेले लोकांमुळे देशभरात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातूनही तबलिकि दिल्लीला गेले होते. ते जिल्ह्यात परतले असून त्यांच्यामुळे करोना संसर्ग पसरण्याची भिती आहे. जिल्हा प्रशासनाने ३२ तबलिकिंची अोळख पटवली आहे.

त्यातील १६ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात अाले आहे. इतर तबलकिंचा प्रशासन शोध घेत आहे. मात्र, जिल्ह्यातून दिल्लीला तबलिकीच्या सोहळयास गेलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यांचा शोध घेणे व अोळख पटविणे सुरु असून त्यात प्रशासनाचा वेळ जात आहे.

तबलिकी लोकांमध्ये मिसळल्यामुळे अनेकांना करोना संसर्ग होण्याची भिती असून रुग्णांची संख्येत भर पडू शकते. त्यामुळे तबलिकिंनी स्वत:हून प्रशासनाला माहिती दयावी. जेणेकरुन प्रशासन वेळीच अशांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करता येईल, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे. तबलिकिंनी माहिती लपविल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर करोना संसर्ग पसरविल्याचा गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा त्यांनी दिला.

रवींद्र शिंदे यांच्याकडे माहिती दयावी

तबलिकिंची माहिती गोळा करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी रवींद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली टीम नियुक्त केली आहे. तबलीकींनी व त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी या टीमकडे माहिती द्यावी. त्यासाठी ९८३३३८९९९९ यानंबरवर संपर्क साधावा.

- Advertisment -

ताज्या बातम्या