Sunday, May 5, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNashik Constituency 2024 : नाशिक आणि दिंडोरी लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार 'या'...

Nashik Constituency 2024 : नाशिक आणि दिंडोरी लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार ‘या’ दिवशी दाखल करणार उमेदवारी अर्ज

बडे नेते राहणार उपस्थित

नाशिक | Nashik

देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून जोरदार प्रचार चालू आहेत. नुकतेच पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यानंतर आता उद्या शुक्रवार (दि.२६) रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यानंतर उर्वरित टप्यातील मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. यामध्ये नाशिक आणि दिंडोरी लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार देखील आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

- Advertisement -

नाशिक लोकसभेसाठी (Nashik Loksabha) महाविकास आघाडीकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजेंना (Rajabhau Waje) तर दिंडोरीसाठी भास्कर भगरे (Bhaskar Bhagre) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर महायुतीचा दिंडोरी लोकसभेचा (Dindori Loksabha) उमेदवार जाहीर झाला असला तरी नाशिक लोकसभेचा उमेदवार घोषित झालेला नाही. त्यामुळे महायुतीचे (Mahayuti) उमेदवार आपला उमेदवारी अर्ज कधी भरणार? याची तारीख निश्चित झालेली नाही. मात्र, महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी २० मे रोजी मतदान (Voting) होणार असून मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारासह उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आघाडी घेतली आहे.

महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरी लोकसभेचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे हे येत्या सोमवारी म्हणजेच २९ एप्रिल रोजी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी अर्ज भरतांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)आणि कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या नियोजनासाठी नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असून शहरातील गोल्फ क्लब मैदानावरून रॅली काढण्यात येईल, असे सांगण्यात आले. तसेच ही रॅली शालिमार मेनरोड या परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार असून त्याठिकाणी मविआचे नेते उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, असेही म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या