Sunday, May 3, 2026
Homeक्राईमNashik Crime : विवाहितेचा सौदा! इव्हेंटच्या नावाखाली दोन लाखांत विक्री; जबरदस्तीने लग्नही...

Nashik Crime : विवाहितेचा सौदा! इव्हेंटच्या नावाखाली दोन लाखांत विक्री; जबरदस्तीने लग्नही लावले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील सातपूर परिसरात (Satpur Area) माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये कामाचे आमिष दाखवून एका १९ वर्षीय विवाहितेची चक्क दोन लाख रुपयांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खळबळजनक म्हणजे, विक्री केल्यानंतर तिचे एका परक्या तरुणाशी (Youth) बळजबरीने लग्नही लावून देण्यात आले.

- Advertisement -

सातपूर पोलिसांनी (Satpur Police) गांभीर्य ओळखून नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथून या पीडितेची तणावपूर्ण वातावरणातून सुखरूप सुटका केली असून, नाशिकमधील मुली विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. १९ वर्षीय विवाहिता सातपूरच्या कार्बन नाका भागात आईकडे राहते. तिला तीन ते चार महिन्यांचे लहान बाळ आहे. ती पतीपासून वेगळी राहत असल्याचे हेरून याच भागात राहणाऱ्या संशयित राणी आणि भागी नावाच्या दोन महिला एजंटांनी तिच्यावर जाळे टाकले. २७ फेब्रुवारी रोजी “तुला इव्हेंटचे चांगले काम मिळवून देतो असे आमिष दाखवून त्यांनी तिला इर्टिका कारमध्ये बसवले.

मालेगावमार्गे (Malegaon) तिला थेट नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे नेले. तिथे पोहोचल्यावर या महिलांनी आपला खरा चेहरा दाखवला आणि पीडितेचा नवनाथ खिरड कर नावाच्या तरुणाशी दोन लाख रुपयांत सौदा केला. पीडितेचा आक्रोश आणि विरोध डावलून तिचा बळजबरीने विवाह लावून देण्यात आला. आता संशयित खिरडकर व इतरांची सखोल चौकशी केली जाणार आहे. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पथकाचे कौतुक केले आहे.

पोलीस-ग्रामस्थ आमनेसामने

२८ फेब्रुवारी रोजी पीडितेने कसाबसा आईशी संपर्क साधला आणि प्रकाराची माहिती दिली. आईने तातडीने सातपूर पोलीस ठाणे गाठले. गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त सचिन बारी व वरिष्ठ निरीक्षक प्रकाश आहिरे यांच्या सूचनेने उपनिरीक्षक राकेश न्हाळदे, हवालदार दीपक खरपडे आणि महिला हवालदार पवार यांचे पथक जातेगावला पोहोचले. मात्र, तिथे पोलिसांनी पाय ठेवताच ३०० ग्रामस्थांनी पोलिसांना घेराव घातला. “आम्ही पैसे देऊन लग्न केले आहे, २ लाख रुपये परत द्या नाहीतर मुलीला नेऊ देणार नाही,” अशी आक्रमक भूमिका घेतली. परिस्थिती हाताबाहेर जात असतानाच नांदगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे याच्या मदतीने अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला आणि जमावाचा वेढा तोडून पीडितेची सुटका करण्यात आली.

मुद्दे

  • सातपूर पोलिसांचे मिशन जातेगाव फत्ते
  • चार महिन्यांचे बाळ घरी असताना मातेचे अपहरण
  • राणी व भागी नावाच्या महिला या रॅकेटच्या सूत्रधार
  • दोन लाखांत सौदा, संशयित महिला सातपूरमधील रहिवासी
  • तीनशे जणांच्या जमावाशी पोलिसांचे दोन हात
  • जमावाचा वेढा तोडून विवाहितेची सुटका
  • इर्टिका कार व चालकाचा शोध सुरु

ताज्या बातम्या

Maharashtra Olympic Association : महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन अध्यक्षपदावर भाजपच्या नेत्यांची बिनविरोध...

0
पुणे | Pune महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या (Maharashtra Olympic Association) अध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये गेल्या वर्षी मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले होते. त्यावेळी अध्यक्षपदासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...