Monday, October 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चार जण ताब्यात

बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चार जण ताब्यात

​त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळवाडे शिवारात असलेल्या एका रिसॉर्टमध्ये बनावट नोटा तयार करून फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
​
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास तळवाडे शिवारातील ‘किकवी रिसॉर्ट’ मधील व्हिला नंबर ४ मध्ये काही इसम संशयास्पदरीत्या थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या प्रशिक्षणार्थी महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जायभाये यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या रिसॉर्टवर अचानक छापा टाकला. त्यावेळी आरोपी संगनमताने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व फसवणुकीच्या उद्देशाने बनावट नोटा तयार करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले.
​
पोलिसांनी मनमाड (ता. नांदगाव) येथील चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर पाचवा संशयित पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पसार झाला असल्याचे समजते

या छाप्यात पोलिसांनी तब्बल १ लाख ७५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये ​८० हजार रुपयांची एक टाटा इंडिका कार (क्रमांक MH 39 2359) , ​दोन ट्रॅव्हल बॅगांमध्ये नोटांच्या आकाराचे पांढरे कागद असलेले १८ बंडल., ​एक नोटा मोजण्याचे मशीन ,​२ इस्त्री, काचेच्या दोन स्लाईड, स्टीलची भांडी,, ​४ अँड्रॉइड मोबाईल हॅन्डसेट, ​आणि ५० हजार ३०० रुपयांची रोख रक्कमअसा ऐवज पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला आहे.
​
या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १८१ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार संशयिताचा शोध सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक देवरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : आठवडाभर प्रचाराची रणधुमाळी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या जनरलच्या सहा जागा आणि सोसायटी मतदारसंघातील चार अशा दहा जागांसाठी येत्या 2 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील...