Thursday, March 13, 2025
Homeक्राईमNashik Crime : मद्यपी तरुणाईवर गंभीर गुन्हा; नरमाईची भूमिका पोलीस अधिकाऱ्याच्या अंगलट

Nashik Crime : मद्यपी तरुणाईवर गंभीर गुन्हा; नरमाईची भूमिका पोलीस अधिकाऱ्याच्या अंगलट

सर्वच बार वेळेत बंद करणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गंगापूररोडवरील (Gangapur Road) प्रसाद सर्कल येथे मध्यरात्री मद्यधुंदावस्थेत तरुणीने घातलेल्या गोंधळाच्या व्हायरल व्हिडीओत पोलिसांनी (Police) नरमाईची भूमिका घेतल्याबाबत ओरड झाल्याने बुधवारपासून शहरात हुक्का पार्लर बंद करण्यात आले. तर, गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जुमडे यांची तातडीने बदली करुन त्यांना नियंत्रण कक्षात धाडण्यात आले आहे. यासह महापालिका व पोलिसांच्या संयुक्त पथकाने गंगापूररोडवरील सर्व ‘रूफटॉप’ हॉटेलांसह बार-कॅफेमध्ये धडक देत तपासणी केली. दरम्यान, गोंधळ घालणाऱ्या मद्यपी तरुणाईसह हॉटेलसह बाऊन्सवर देखील गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जुमडे यांची पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्यामार्फत चौकशी सुरु आहे.

- Advertisement -

प्रसाद सर्कल येथे मध्यरात्री पोलिसांसमक्ष घडलेल्या प्रकरणानंतर, गंगापूर पोलीस ठाण्यातील (Gagapur Police Station) अंमलदार शरद पाटील यांच्या फिर्यादीनुसार सात संशयितांवर सरकारी कामात अडथळा आणणे, सार्वजनिक शांतता भंग करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे या कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे. संशयित मयूर अशोक साळवे (३०, रा. कमलनगर, सिडको), वैशाली राजेंद्र वाघमारे (३२, रा.शिखरेवाडी, नाशिकरोड), भूमी विजय ठाकूर (१९, रा. भाभानगर) व अल्तमश गुलाम अहमद शेख (२०, रा. वडाळागाव) हे रविवारी (दि. ९) मध्यरात्री अडीच वाजता गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कल येथील मंत्रा हॉटेलजवळील सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत होते.

संशयितांनी अमली पदार्थाचे सेवन केले होते. त्यामुळे गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौघांकडे चौकशी केली. त्यावेळी चौघांनीही स्वतःची ओळख सांगण्यास नकार देत पोलिसांसोबत वाद घातला.तसेच रस्त्यावरील दगड उचलून आम्हाला मारण्याची किंवा स्वतःस मारून घेण्याची धमकी दिली. तेव्हा मयूरने पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की केली. तसेच हॉटेल मंत्राच्या दोन बाऊन्सरने संशयितांना मदत करण्याच्या उद्देशाने पोलिसांना कारवाईपासून विरोध केला. गंगापूर पोलिसांनी संशयित मयूर, वैशाली, घेतले आहे. सीसीटीव्ही फूटेजची भूमी आणि अल्तमश यांना ताब्यात तपासणी सुरु आहे.

बार, हुक्का पार्लरची तपासणी

शहरातील हॉटेल, बार, कॅफेंमधील प्रकारांवर आजपासून नजर ठेवण्यात आली. गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तेरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सर्वच अंमली पदार्थ व हॉटेल्स आस्थापना वेळेत बंद करण्याचे आदेश दिले. यासह बुधवारी दुपारी महापालिका व पोलिसांची संयुक्त पथके बार, हॉटेल, कॅफेमध्ये धडकली. यासह शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला रोख लावण्यासह रस्त्यावरील धिंगाणा रोखण्यासाठी आता ‘ऑपरेशन क्लिनअप’ राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पोलिस आयुक्तांनी सर्व प्रभारी निरीक्षकांना सक्तीने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. त्या कारवाईला पोलिसांनी सुरूवात केली आहे.

संशयिताकडून हप्तेखोरीचा आरोप

प्रसाद सर्कल येथे धिंगाणा घालणाऱ्या तरुणाईचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शहरातून टीकेची झोड उठली आहे. गंगापूर पोलिसांनी कारवाईत दिरंगाई केल्याने तेथील वरिष्ठ निरीक्षकाची बदली करून आयुक्तांनी दणका दिला. परंतु, शहरात उशिरापर्यंत रंगणाऱ्या ‘ओल्या पार्त्या’, हुक्का बार व हुल्लडबाजीला नेमका कोणाचा पाठींबा आहे, यासह पोलिसांच्या नरमाईच्या भूमिकेचे कारण काय, हा प्रश्न नाशिककरांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, पोलीस आणि तरुणाईच्या वादात एका संशयिताने ऑन कॅमेरा पोलिसांच्या हप्तेखोरीचा विषय छेडला. त्यामुळे नेमके काय चालले आहे, असा प्रश्न नाशिककरांनी उपस्थित केला.

परवाना रद्द?

हॉटेल मंत्रामध्ये निर्धारीत वेळेपेक्षा रात्री उशीरापर्यंत हॉटेल सुरु ठेवल्याबद्दल हॉटेलचा व्यवस्थापक राकेश शांताराम जाधव (३१, रा. अशोकनगर) यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला असून मंत्रा हॉटेलला परमिट रुमचा परवाना असून संबंधित हॉटेलला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यात परवाना रद्द का करण्यात येऊ नये याचा खुलासा सात दिवसांत करावा, असे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी दिले आहेत.

पोलीस आयुक्तांचे आदेश

  • शहरातले सगळे बार नियोजित वेळेत बंद करावेत.
  • विनापरवानगी परमिट, ऑक्रस्टा सुरू असल्यास बंद करा.
  • हॉटेल, बारमध्ये नियोजित जागेपेक्षा इतरत्र टेबल टाकून दारू विक्री होत असल्यास गुन्हे नोंदवा.
  • प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘प्रभारी’ निरीक्षकांनी आस्थापना बंद कराव्यात.
  • क्लब, हुक्का, बार, पब यावर बारीक लक्ष ठेवा.
  • ध्वनीप्रदूषण, नियमांचे उल्लंघन यासंदर्भात तातडीने गुन्हे नोंदवा.
YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...