Thursday, March 13, 2025
Homeक्राईमNashik Crime : गणेशवाडीत दोन गटांचा राडा; दंगा केल्याचा गुन्हा नोंद

Nashik Crime : गणेशवाडीत दोन गटांचा राडा; दंगा केल्याचा गुन्हा नोंद

पोलिसांसमक्ष काढली 'खुन्नस'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

काहींना काही कारणातून मद्याच्या नशेत दोन गटांतील (Two Group) सराईतांच्या कुरबुरीने पंचवटीकरांना (Panchvati) वेठीस धरले जात असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. गणेशवाडीतील (Ganeshwadi) पंचवटी सब पोस्ट ऑफिससमोर (दि. ३१) रात्री सव्वा अकरा वाजता दोन सराईतांच्या टोळ्यांनी पोलिसांच्या हजेरीतच एकमेकांवर दगड, मद्याच्या बॉटल आणि विटांचा मारा करुन खुन्नस काढल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी पंचवटी पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल करुन घेत पसार झालेल्या सराईतांची धरपकड केली आहे.

- Advertisement -

ओम्या उर्फ कार्तिक महेंद्र बेल्हाडकर (रा. कमलनगर, हिरावाडी) आणि त्याचे तीन साथीदार व दुसऱ्या गटातील मयूर उर्फ डान्सर भास्कर पवार (रा. कोळीवाडा, गणेशवाडी) आणि त्याचे तीन साथीदार अशी दोन्ही टोळ्यांच्या मुख्य सूत्रधार संशयितांची नावे आहेत. त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ, हाणामारी व दगडफेक करुन दंगा (Riots) केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पंचवटीतील गणेशवाडीत (Ganeswadi) आजमितिस नव्याने गल्लीबोळातील दोन भाईंच्या टोळ्या उदयास येत आहेत. या टोळीत काहीना काही कारणातून जुने वाद आहेत. हे वाद कधीना कधी उफाळून येत तुफान राड्याच्या माध्यमातून समोर येतात. मयूर डान्सर व बेल्हाडकर यांच्या टोळीत पूर्वाश्रमीपासून छोटे मोठ वाद आहेत. त्यातूनच, शुक्रवारी (दि. ३१) रात्री साडेसात वाजता दोन्ही टोळ्यांपैकी एका टोळीतील मद्यपिने परिसरातील महिलेची छेड काढून वाद घातला.

त्यानंतर, पंचवटी पोलिसांना (Panchvati Police) कळविण्यात आले असतानाच, तत्पूर्वीच संशयितांनी पळ काढला.हा प्रकार झाल्यानंतर रात्री सव्वा अकरा वाजता बेल्हाडकर व पवार टोळी मद्याच्या नशेत समोरासमोर आली. त्यांनी परिसरात दहशत माजवून आरडाओरड करत एकमेकांच्या दिशेने दगड, विटा व विस्की अन् बिअरच्या बॉटलचा मारा सुरु केला. यावरच न थांबता दांडक्यांनी एकमेकामवर चाल करण्याचा प्रयत्न करत हाणामारी केली.

दरम्यान, घटनेची माहिती कळताच पंचवटी पोलिसांचे रात्रगस्त अधिकारी व अंमलदार दाखल झाले. पोलीस पथक (Police Squad) हजर असतानादेखिल संशयित टोळ्यांनी (Suspect Gang) मद्याच्या नशेत येथेच्छ धूडगुस घालून परिसराच्या शांततेला गालबोट लावले. तपास हवालदार नाईक करत आहेत.

मुद्दे

बेल्हाडकरवर पूर्वीच तीन ते चार गुन्हे
मयूर डान्सरवरही गुन्हे
दोन्ही टोळ्या एकमेकांच्या विरोधात
जुने वाद, खुन्नस काढण्यासाठी वारंवार कुरबुरी
याआधीही झाल्या आहेत हाणामाऱ्या
गणेशवाडीसह, पंचवटी, हिरावाडीत टोळ्यांची दहशत
दोन्ही टोळ्यांतील काही संशयित चतुर्भूज

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...