Saturday, September 12, 2026
Homeक्रीडाIPL 2026 : बंगळूरु समोर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान; कुणाचे पारडे जड?

IPL 2026 : बंगळूरु समोर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान; कुणाचे पारडे जड?

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (सोमवारी) नवी दिल्ली (New Delhi) येथील अरूण जेटली मैदानावर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Delhi Capitals and Royal Challengers Bangalore) यांच्यात सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता खेळविण्यात येणार असून, सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि जियो हॉटस्टारवर करण्यात आले आहे.

- Advertisement -

आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला असल्यामुळे अंतिम ४ मध्ये स्थान निश्चित करण्यासाठी सर्व १० संघांमध्ये कमालीचा रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे बाद फेरीच्या लढतीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी सर्व संघ आपले सर्वस्व पणाला लावून मैदानावर (Ground) उतरतील यात शंका नाही. दिल्ली कॅपिटल्सने बंगळूरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभूत केले होते. त्यामुळे बंगळूरुला दुसऱ्यांदा पराभूत करून विजयी चौकार मारण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली सज्ज झाला आहे.

दुसरीकडे बंगळूरु संघाने अखेरच्या सामन्यात गुजरात टायटन्स विरूध्द ५ गडी राखून विजय संपादन केला असून, विजयी षटकार मारण्यासाठी आणि बाद फेरीचा दावा अधिक मजबूत करण्यासाठी उत्सुक आहे. बंगळुरू संघाचे कर्णधारपद रजत पाटीदारकडे सोपविण्यात आले आहे. आयपीएल स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये नवी दिल्ली येथील अरूण जेटली मैदानावर १० सामने खेळले गेले असून, बंगळूरुचा संघ ६-४ फरकाने आघाडीवर आहे. तसेच एकूण ३४ सामने खेळले असून, बंगळूरु संघ २०-१३ फरकाने आघाडीवर आहे.

प्रमुख खेळाडू : अक्षर पटेल, विराट कोहली, रजत पाटीदार, भुवनेश्वर कुमार

ताज्या बातम्या

मका प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार –...

0
नाशिक, दि. 11 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : जिमाका वृत्तसेवा चिंचोंडी औद्योगिक वसाहतीमध्ये सुखजित बायोकॉर्न लिमिटेडकडून सुमारे रूपये ७६० कोटींची गुंतवणूक असलेला अत्याधुनिक कृषी-आधारित अन्नप्रक्रिया उद्योग...