Thursday, August 20, 2026
Homeक्राईमNashik News : मोबाईलमध्ये मग्न अन् काळाचा घाला; भद्रकालीत तरुण चौथ्या मजल्यावरून...

Nashik News : मोबाईलमध्ये मग्न अन् काळाचा घाला; भद्रकालीत तरुण चौथ्या मजल्यावरून खाली कोसळला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मोबाईलच्या (Mobile) अतिवापरामुळे किंवा त्यातील मग्नतेमुळे अपघाताच्या (Accident) घटनांमध्ये वाढ होत असतानाच, नाशिकच्या (Nashik) भद्रकाली परिसरातून एक गंभीर घटना समोर आली आहे. चौथ्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीत बसून मोबाईलवर सर्फिग करताना, सतरा वर्षीय मुलाचा अचानक तोल गेला. चौथ्या मजल्यावरून थेट खालील मजल्यावरील पत्र्याच्या शेडवर आदळल्याने तो जबर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

- Advertisement -

अरबाज सलीम खान (वय १७, रा. लक्ष्मी, हिंदू समाज मंदिरासमोर, म्हसोबावाडी, शिंगाडा तलाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. अरबाज हा सध्या शिक्षण (Education) घेत असून रविवारी (दि. २६) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घरातील बाल्कनीत बसून मोबाईलवर इंटरनेट सर्फिग करण्यात मग्न होता. तो इतका हरवून गेला की, आजूबाजूच्या परिस्थितीचे भान राहिले नाही. याच दरम्यान त्याचा अचानक तोल गेला आणि तो थेट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळला चौथ्या मजल्यावरून पडताना अरबाज थेट दुसऱ्या मजल्यावरील पत्र्याच्या शेडवर आदळला आणि त्यानंतर जमिनीवर पडला.

या गंभीर अपघातामुळे (Accident) पत्र्याचा मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून शेजारी राहणारे धुगेस यादव यांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली. त्यांना अरबाज रक्ताच्या थारोळ्यात आणि निपचित पडलेला दिसला. यादव आणि इतर रहिवाशांनी अरबाजला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात (Hospital) दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाजच्या डोक्याला, छातीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

पोलीस तपास सुरू

घटनेच्या वेळी अरबाज घरात एकटाच होता. त्याचे कुटुंबीय काही कामानिमित्त बाहेर गेले होते. माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ही घटना अपघात आहे की अन्य संशयास्पद प्रकार याचा अधिक तपास भद्रकाली पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कर्जमाफीसाठी 4 हजार कोटी; दुसर्‍या टप्प्यात लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 च्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने दुसर्‍या टप्प्यात 4 हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली...