Wednesday, May 6, 2026
Homeक्राईमNashik Crime : दुबईवारीचा स्वप्नभंग; बोगस विमान तिकिटे दिली

Nashik Crime : दुबईवारीचा स्वप्नभंग; बोगस विमान तिकिटे दिली

संगमनेरच्या कंपनीकडून ५० प्रवाशांची फसवणूक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दुबईला (Dubai) जाण्याचे हवाई सफारीचे स्वप्न सत्यात उतरवण्याच्या नादात नाशिकमधील (Nashik) ५० प्रवाशांना १० लाख ८२ हजारांच्या फटक्यासह मनस्ताप ‘वेगळा’ सहन करावा लागला. शहरातील (City) एका ट्रॅव्हल कंपनीला तिकिटांचे पैसे दिले असतानाही कंपनीने अहिल्यानगरातील माईल्सस्टोन हॉलिडेज कंपनीस विमानाची (Flight) तिकिटे काढण्यास सांगितल्यावर माईल्सस्टोनच्या संचालकांनी बोगस तिकिटे दिल्याचे समोर आले.

- Advertisement -

विशेष म्हणजे मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) चेकइनदरम्यान तिकिटांची पडताळणी झाली असता या सर्वांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळे अचानक दुबई दौरा (Dubai Tour) रद्द करण्याची वेळ नाशिकच्या टूर ऑपरेटवर आली आहे. याबाबत नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात माईल्सस्टोन हॉलिडेजवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्यनारायण रामनिवास चौधरी (रा. सिद्धिविनायकटाऊनशिप, अमृतधाम, पंचवटी) यांनी याबाबत सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार, माईल्सस्टोन कंपनीचे संचालक तेजस शशिकांत वैष्णव व मधुमती शशिकांत वैष्णव आणि शशिकांत वैष्णव (सर्व रा. शक्तिमान टॉवरजवळ, बसस्टँडसमोर, संगमनेर, जि. अहिल्यानगर) अशी संशयितांची नावे आहेत.

दरम्यान, हा संपूर्ण प्रकार २ नोव्हेंबर २०२४ ते १८ जून २०२५ या कालावधीत घडला. चौधरी यांची प्रवासी कंपनी असून त्यांनी माईलस्टोन कंपनीला ५० जणांचे मुंबई ते दुबई प्रवासाचे विमान तिकिटे (Ticket) काढण्यासाठी १० लाख ८२ हजार ५०० रुपये दिले होते. तेव्हा कंपनीने विमान तिकिटांचे पीएनआर अस्तित्वात नसताना ते पीएनआर नंबर असलेले १७ प्रवाशांचे बनावट तिकिटे चौधरी यांना दिली. तर इतर चार तिकिटे खरेदी करून त्याच दिवशी रद्द केली असताना तीसुद्धा चौधरींकडे पाठवली. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे तपास करत आहेत.

अशी केली गोलमाल

पीएनआर नंबर अस्तित्वातच नसताना २९ प्रवाशांची नावे असलेल्या तिकिटांमध्ये विविध प्रवाशांच्या नावात बदल करून त्यात ५० पैकी काही प्रवाशांच्या नावांची बनावट नोंद करून ही तिकिटे खरी असल्याचे भासवले. तिकिटासाठी दिलेल्या १० लाख ८२ हजार रुपयांची तिकिटे न काढता या रकमेचा अपहार केला.

चौधरींना नऊ लाखांचा भुर्दंड

या बनावट तिकिटांवर विसंबून राहिल्याने चौधरी व त्यांच्या नोंदणीकृत प्रवाशांना विमानतळ सुरक्षा प्राधिकरणाने प्रवेश
नाकारला. त्यामुळे चौधरी यांच्या कंपनीला मुंबई ते दुबई ही यात्रा तत्काळ रद्द करावी लागली. तर तिकिटांसाठी दिलेली रक्कम, यात्रा आयोजनासाठीचा खर्च आणि प्रवाशांना परत अदा करावा लागलेले अतिरिक्त नऊ लाख रुपये अशी एकूण १९ लाख ८२ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दृष्टिक्षेपात

  • संशयितांवर बीएनएस कलमांसह आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा
  • नोटीस बजावण्या सोबतच संशयितांना अटक होणार
  • बनावट पीएनआरचा वापर
  • प्रवाशांना सहन करावा लागला मनस्ताप
  • संगमनेरला जाणार तपास पथक
  • दुबईवारीचे स्वप्न अधुरेच

ताज्या बातम्या

Ahilyanagar : झेडपी प्रशासन नव्याने बदल्यांचे वेळापत्रक तयार करणार !

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जनगणनेच्या कामासाठी यंदा बहुतांश जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना जबाबदारी दिल्याने त्यांच्या बदली प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. या वर्षी सरकारच्या सुचनेनूसार जनगणनेचे कामे...