Friday, September 11, 2026
Homeक्राईमNashik Crime : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत चोरट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला;...

Nashik Crime : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत चोरट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nashik Agricultural Produce Market Committee) भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेने सुरक्षेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. कोचरगाव येथील शेतकरी (Farmer) सुनील गांगुर्डे यांच्यावर अज्ञात चोरट्याने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. गांगुर्डे याच्या मानेवर गंभीर वार झाले असून, या घटनेमुळे बाजार आवारात एकच खळबळ उडाली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime : धक्कादायक! फरारी आरोपीची आत्महत्या; ‘सुसाईड नोट’ मध्ये महिलेचा उल्लेख करुन केले गंभीर आराेप

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज (गुरुवारी) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ‘किसान व्हेजीटेबल’ कंपनी परिसरात नेहमीप्रमाणे मोठी गर्दी होती. गांगुर्डे हे आपला माल विक्रीसाठी घेऊन आले असताना गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने चोरीचा (Thief) प्रयत्न केला. यावेळी गांगुर्डे यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न करताच चोरट्याने संतापाच्या भरात खिशातील धारदार शस्त्र काढून त्यांच्या मानेवर वार केला. हल्ल्यानंतर गांगुर्डे रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच परिसरात घबराट पसरली.

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : मंत्रालयाजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये खोल्या कायमच्या बुक, ‘वर्षा’वर खास पूजेची चर्चा; खरातसाठी माजी मुख्यमंत्र्यांकडून विशेष खातीरदारी

दरम्यान, घटनेनंतर संशयित आरोपीने गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी उपस्थित शेतकरी व व्यापाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पसार होण्यात यशस्वी ठरला. जखमी गांगुर्डे यांना तातडीने शासकीय रुग्णालयात (Civil Hospital) दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याचे सांगितले.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : ज्या कार्यालयात महिलांसोबत करायचा अश्लील चाळे SIT ने तेच केले सील; लिंगपिसाट खरातला दणका

सुरक्षा रामभरोसे, शेतकऱ्यांचा संताप

या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “आम्ही रात्रंदिवस कष्ट करून माल बाजारात आणतो, पण इथे आमचा जीवच सुरक्षित नसेल, तर न्याय कुणाकडे मागायचा?” असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. बाजार समितीत दररोज कोट्यवधींची उलाढाल होत असतानाही सीसीटीव्ही यंत्रणा व सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही चोरीच्या घटना घडूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, असा आरोप होत आहे. दरम्यान, पंचवटी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, फरार संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : “अवतार पूजा केली नाही तर मृत्यू होईल, हातातील तांदूळ सांडले तर नाग डसेल”; भोंदू खरातने बांधकाम व्यावसायिकास भीती घालून मर्सिडीज लांबविली

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळाची चाहूल; ऑगस्टपाठोपाठ सप्टेंबरही कोरडा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्ह्यात ऑगस्टपाठोपाठ सप्टेंबर महिन्यातही पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिके होरपळून निघत असून राहुरी, श्रीरामपूर,...