Thursday, June 11, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime : "अवतार पूजा केली नाही तर मृत्यू होईल, हातातील...

Ashok Kharat Crime : “अवतार पूजा केली नाही तर मृत्यू होईल, हातातील तांदूळ सांडले तर नाग डसेल”; भोंदू खरातने बांधकाम व्यावसायिकास भीती घालून मर्सिडीज लांबविली

उकळली तब्बल 'एवढ्या' कोटींची खंडणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जगाच्या पाठीवर २१ देशांत फिरून परिस शक्ती प्राप्त करून देण्याचे आमिष दाखवून आणि जादूटोण्याच्या माध्यमातून मृत्यूची (Death) भीती घालून एका बांधकाम व्यावसायिकाला तब्बल ४ ते ५ कोटींचा गंडा घालणाऱ्या अशोककुमार खरात उर्फ ‘कॅप्टन’ या भोंदूबाबाचा खरा चेहरा अखेर समोर आला आहे. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर आणि सिन्नरमधील मिरगाव परिसरात दैवी शक्तीचा बनाव रचून, व्यावसायिकाची ९० लाखांची मर्सिडीज कार आणि कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या या भोंदूविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील अघोरी कृत्ये आणि फसवणुकीची पद्धत पाहता नाशिक पोलिसही चक्रावले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : मंत्रालयाजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये खोल्या कायमच्या बुक, ‘वर्षा’वर खास पूजेची चर्चा; खरातसाठी माजी मुख्यमंत्र्यांकडून विशेष खातीरदारी

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना लॉजिस्टिक व्यवसायात यश मिळवून देण्याचे आमिष दाखवून खरातने जाळ्यात ओढले. “अवतार पूजा” केली नाही तर मृत्यू होईल, अशी भीती घालत सुरुवातीला ९० लाखांची मर्सिडीज कार (एमएच १५ जीएल ८१८१) जबरदस्तीने स्वतःच्या नावावर करून घेतली. धक्कादायक म्हणजे, १ ऑक्टोबर २०१८ रोजी मिरगाव येथील मंदिरात पूजेदरम्यान प्लास्टिकच्या बनावट (Fake) सापाचा वापर करून नागदेवता प्रसन्न झाल्याचा बनाव त्याने रचला होता. “हातातील तांदूळ सांडले तर नाग डसेल” असे सांगून त्याने जासूद यांना डोळे मिटून मंत्रजपास भाग पाडले आणि हातचलाखीने खोटा साप दाखवून चमत्कार होत असल्याचे भासवले, असे नमूद आहे. या प्रकरणी बीएनएससह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ च्या कलम ३(१) व ३ (२) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : पाप झाकण्यासाठी खरातचा नीच डाव! पीडितेची ढाल करत ऑफिसबॉयला बनवले ‘बळीचा बकरा’

भोंदू खरातने जासूद यांना परिस शक्ती प्राप्त करण्यासाठी ५ वर्षांत २१ देशांत फिरून तेथील मातीची पूजा करण्याची सक्ती केली. स्वतःच्या उपचारांसाठी आणि पर्यटनासाठी त्याने जासूद यांच्या मृत्यूच्या भीतीचा गैरफायदा घेतला. म्यानमार, ग्रीनलँड, अमेरिका, युगांडा, इजिप्त आणि बांगलादेश यांसह अनेक देशांचा प्रवास त्याने जासूदच्या खर्चाने केला. केवळ प्रवासावरच न थांबता, स्वतःच्या नवीन फार्महाऊससाठी तुर्कस्थानह्न ९० लाखांचे फर्निचर, २९ लाखांचे सागवान लाकूड आणि ४२ लाख ५० हजारांच्या किचनमधील वस्तू खरेदी करण्यास जासूद यांना भाग पाडले. हे सर्व व्यवहार जासूद यांनी आरटीजीएस आणि ऑनलाइन माध्यमातून केल्याचे नमूद आहे.

हे देखील वाचा :  Ashok Kharat Crime News : पूजाविधीच्या नावाने उकळली खंडणी; खरातविरुद्ध आठ गुन्हे, पीडितांच्या सात फिर्यादी

अघोरी कृत्ये अन्? रिंगण घालून कैद

सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील महादेव मंदिराच्या मागे खडूने रिंगण ओढून खरातने जासूद यांना त्यात उभे केले आणि “बाहेर पडलात तर भस्म व्हाल” अशी भीती घालून अन्यायाने कैद केले होते. याच ठिकाणी त्यांना फर्निचरसाठी पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले गेले. खरातने वेळोवेळी काळी जादू करून संपवून टाकण्याची धमकी फोनवरून दिली होती.

हे देखील वाचा :  Ashok Kharat Crime : व्यवसायात नशीब आजमवणाऱ्या युवकाला भोंदू खरातने दिला होता सिन्नर सोडून जाण्याचा सल्ला; आता ‘तोच’ बनला नगरसेवक

अखेर बिंग फुटले !

जेव्हा जासूद यांनी गुपचूप माहिती काढली, तेव्हा त्यांना खरात हा भोंद असल्याचे आणि तो प्लास्टिकच्या सापाने व हातचलाखीने भाविकांना फसवून पैसे उकळत असल्याचे लक्षात आले. जासूद यांनी पैसे परत मागितले असता, खरातने उलट त्यांनाच कुटुंबासह संपविण्याची धमकी दिली आणि त्यांच्यावरच खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला. अखेर जासूद यांनी २५ मार्च २०२६ रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : भोंदूचा विळखा – भाग १ : खरातला भक्तांनी दाखवला कमाईचा ‘नवा’ मार्ग; बडे उद्योग घराणेही प्रेमात

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुरीसह अन्य कृषी विद्यापीठांतील पद भरतीचा मार्ग मोकळा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे. तब्बल 23 वर्षांनंतर विद्यापीठांच्या अ आणि ब संवर्गातील एकूण 3,723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता...