Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : अधिकाऱ्यासह वनपालावर लाचखोरीचा गुन्हा; एसीबीची कारवाई

Nashik Crime : अधिकाऱ्यासह वनपालावर लाचखोरीचा गुन्हा; एसीबीची कारवाई

टेम्पो सोडण्यासाठी खाबूगिरी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शेतात (Farm) तोडलेल्या झाडांचे लाकूड कंपनीत विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या (Farmer) पिकअप वाहनाला अडवून त्याच्या निर्धोक सुटकेसाठी दहा हजारांची लाच (Bribe) घेणाऱ्या सहायक वनसंरक्षकासह त्याच्या वनपालावर कारवाई करण्यात आली आहे. शिरीषकुमार सजन निरभवण (वय ५४) असे संशयित सहायक वनसंरक्षकाचे नाव असून सुरेश कारभारी चौधरी ( वय ४४) असे वनपालाचे नाव आहे. ही घटना उजेडात आल्याने वनखात्यातील लाचखोरी जोरात सुरु असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

वाळलेल्या लाकडाची वाहतूक करणाऱ्या जीपवर वनविभागाने (Forest Department) ३१ जानेवारी रोजी कारवाई कली होती. ही जीप सोडून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच वनपाल सुरेश चौधरी यांनी स्वीकारून सहायक वनसंरक्षक (एसीएफ) शिरीषकुमार निरभवणे यांना फोनवरून रक्कम मिळाल्याची माहिती दिल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना जाळ्यात घेतले. त्यांच्याविरूद्ध वाडीव-हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-corruption Department) नाशिक परिक्षेत्र कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक पश्चिम वनविभागाचे सहायक वनसंरक्षक संशयित निरभवणे यांनी संशयित चौधरी यांच्यामार्फत लाचेची रक्कम मागितली. यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.तक्रारदाराकडून जांभळाचे व सादडाचे वाळलेले झाडांची लाकडे मालवाहू जीप (एम.एच०४ एएस ८०७७) मधून गोंदे येथील पेपर मिल येथे विक्रीसाठी वाहतूक केली जात होती. निरभवणे, चौधरी यांच्या पथकाने ही जीप ताब्यात घेतली होती.

म्हसरूळ येथील वनविभागाच्या शासकीय आगारात जीप जमा करण्यात आली होती. मालासह वाहन सोडून देण्याच्या मोबदल्यात निरभवणे यांनी चौधरी यांच्यामार्फत दोन हजारांचा दंडाव्यतिरिक्त १० हजारांची लाचेची मागणी केली. तक्रारदाराकडून चौधरी यांनी लाचेची रक्कम स्वीकारली असता पंचांसमक्ष पथकाने त्यांना ताब्यात घेतले. तत्पूर्वी त्यांनी फोनवरून निरभवणे यांना रक्कम मिळाल्याची माहिती कळवली. त्यानंतर निरभवणे यांनी त्याला गाडी सोडण्याची ऑर्डर घेण्यास पाठवून दे, असे चौधरी यांना फोनवरून सांगितले. यामुळे या दोघांविरूद्ध वाडीव-हे पोलीस ठाण्यात (Police Station) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या फिर्यादीवरुन भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशीरापर्यंत सुरू होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...