नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक परिक्षेत्रातील जानेवारी ते डिसेंबरपर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) १४४ सापळा त्यातच लावण्यात आले. २०८ लाचखोर (Bribe Taker) लोकसेवकांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर, यावर्षीही नाशिकने (Nashik) राज्यात भ्रष्टाचारात पहिला क्रमांक पटकावला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्रांतर्गत नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या ५ जिल्ह्यांचा समावेश होतो. नाशिक परिक्षेत्राने २०२३ सालीही भ्रष्टाचाराच्या (Corruption) सापळा कारवायात आघाडी घेतली होती. यंदाही राज्यात सर्वाधिक सापळा कारवाया नाशिक परिक्षेत्रात झाल्या आहेत. यात अपसंपदेचा एक गुन्हा नोंदवला गेला. दोघांना संशयित करण्यात आले आहे. अन्य भ्रष्टाचाराचे दोन गुन्हे (Case) दाखल झाले असून त्यात १६ आरोपींचा समावेश आहे.
६० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची लाच (Bribe) २०८ भ्रष्टाचारी लोकसेवकांनी घेतल्याची नोंद एसीबीकडे आहे. २०२२ च्या तुलनेत २०२३ साली सापळा कारवायांचा आलेख अधिक उंचावलेला राहिला. एकूण १६१ सापळा कारवाया झाल्या. नाशिक परिक्षेत्राअंतर्गत महसूल खात्याशी संबंधित वेगवेगळ्या विभागांत लाचखोरीचे अधिक प्रकार उघडकीस आले आहेत. महसूलमध्ये सर्वाधिक सापळा कारवाया एसीबीकडून करण्यात आल्या. त्या खालोखाल पोलीस खात्याचा क्रमांक लागतो.
दरम्यान, लाचखोरीची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्र कार्यालयात (Office) थेट करता येते. यासाठी कार्यालयाकडून ०२५३- २५७८२३० हा क्रमांक जारी करण्यात आला आहे. तसेच, टोल फ्री म्हणून १०६४ ही राज्यस्तरीय हेल्पलाइनवरसुद्धा तक्रार नोंदवता येते.
पाच आकडी पगार तरी हाव
शासकीय लोकसेवकांना पाच आकडी पगार असला तरी काही सेवक भ्रष्टाचाराच्या मोहजालात अडकतात. टेबलाखालून लाचेची रक्कम स्वीकारण्याचा मोह त्यांना आवरता येत नाही, सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करून काम करण्याच्या मोबदल्यात लाचेची रक्कम मागण्याचा प्रताप भ्रष्टाचारी लोकसेवकांकडून केला जातो.
चर्चेतील कारवाया
१) राज्य पुरातत्व विभागाचे तत्कालीन संचालक तेजस गर्गे, सहायक संचालक आरती आळे यांच्यावर कारवाई.
२) शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह तिघांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा ठपक्याखाली गुन्हा दाखल.
३) मनपाचे सेवानिवृत्त अग्निशमन अधिकारी अनिल महाजन व त्यांच्या पत्नीविरुद्ध १ कोटी ३१ लाख ४२ हजारांच्या अपसंपदेचा गुन्हा नोंद.
४) जिल्हा परिषदेतील तत्कालीन लाचखोर अभियंता नंदलाल विक्रम सोनवणे यांना रंगेहात पकडले.
५) दिवाणी न्यायालयातील तत्कालीन सहायक अधीक्षक वाढदिवसालाच जाळ्यात.
नाशिक परिक्षेत्रातील कारवाया
नाशिक ५०, अहिल्यानगर २८, नंदुरबार १२, जळगाव ३४ आणि धुळे २०