Wednesday, April 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime : लोंढे टोळीची 'कुंडली' पोलिसांच्या हाती; मोक्का तपासात पीडित जखमी...

Nashik Crime : लोंढे टोळीची ‘कुंडली’ पोलिसांच्या हाती; मोक्का तपासात पीडित जखमी निघाला ड्रग्ज तस्कर

चोथवेही तुरुंगात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सातपूर (Satpur) येथील आयटीआय सिग्नलजवळील ‘ऑरा’ बारमधील गोळीबार प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात येत असून, संशयित लोंढे टोळीविरुद्धच्या (Londhe Gang) ‘मोक्का’ कारवाईने वेग घेतला आहे. तपास करताना या गुन्ह्यात गोळीबारच नाही तर पुरावे नष्ट करणे आणि अमली पदार्थांची तस्करी असे गंभीर पदर उघड झाले आहेत.

- Advertisement -

अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी (Sachin Bari) या प्रकरणाचा तपास करत असून, पोलिसांनी रिपाइं जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संशयित प्रकाश मोगल लोंढे उर्फ बॉस, त्याचा मुलगा दीपक उर्फ नानाजी प्रकाश लोंढे आणि राहुल सत्यविजय गायकवाड व इतर दोघांना पुन्हा कारागृहातून ताब्यात घेतले आहे. या संशयितांना सोमवार (दि. १६) पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयाने या टोळीच्या गुन्हेगारीची सविस्तर ‘कुंडली’ तयार केली असून, यात सहभागी असलेल्या १७ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, यामध्ये मुख्य सूत्रधार प्रकाश लोंढे (Prakash Londhe) दीपक लोंढे, भूषण लोंढे, प्रिंस सिंग, शुभम उर्फ भुऱ्या राजू पाटील, दुर्गेश संतोष वाघमारे, आकाश उर्फ अभिजीत राजू अडांगळे, संतोष शेट्टी पवार उर्फ जल्लाद, अमोल बाबासाहेब पगारे, देवेश गजानन शेरताटे, शुभम रामगिर गोसावी, सनी उर्फ ललीत अशोक विठ्ठलकर, शुभम चंद्रकांत निकम, वेदांत संजय चाळगे, राहुल सत्यविजय गायकवाड, निखिल मधुकर निकुंभ आणि संदीप रमेश गांगुर्डे या संशयितांचा (Suspected) समावेश आहे.

फायरिंग सोसलेला संशयित!

तेव्हा झालेल्या गोळीबारात जखमी झालेला वरुण उर्फ गोल्या तिवारी हाच आता अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. ज्याने सुरुवातीला फिर्याद देण्यास टाळाटाळ केली होती, तोच आता तस्कर म्हणून समोर आल्याने गुन्हेगारीची व्याप्ती स्पष्ट झाली आहे. तसेच, घटनेनंतर बारमधील रक्ताचे डाग पुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणारा बारचालक बिपिन पुरुषोत्तम पटेल आणि त्याचा मित्र अटकेनंतर सध्या नाशिकरोड कारागृहात आहेत. त्यामुळे बारमध्ये सांडलेले रक्त पुसून गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करणारा बारचालक आणि जखमीच्या वेशात तस्करी करणारा ‘तस्कर’ आता एकाच रांगेत उभे आहेत.

ताज्या बातम्या

उमराणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक

0
उमराणे | वार्ताहर Umrane येथील स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत सलग सहा दिवसांच्या सुट्टीनंतर कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू झाल्याने गत दोन दिवसापासून विक्रमी...