Saturday, May 30, 2026
Homeक्राईमNashik Crime : मामा राजवाडेच्या अडचणीत वाढ; आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल

Nashik Crime : मामा राजवाडेच्या अडचणीत वाढ; आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल

राहुल जैन-बागमारसह इतरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

विसे मळा गोळीबार प्रकरणात भाजप नेते सुनील बागूल (Sunil Bagul) यांचे समर्थक बाबासाहेब ऊर्फ मामा वाल्मिक राजवाडे आणि अमोल पाटील या दोघांना गुन्हे शाखेने अटक (Arrested) केली होती. त्यानंतर राजवाडेला सुरुवातीला नाशिक न्यायालयाने (Nashik Court) सोमवार (दि.१३) पर्यंत कोठडी सुनावली होती. यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता गुरुवार (दि.२३) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, आता मामा राजवाडेच्या अडचणीत आणखी वाढ झाली.

पंचवटीतील मालेगाव स्टँन्ड येथील पंजाब बारच्या मालकाकडून मोफत मद्यासह खंडणी मागण्याच्या प्रकरणात मामा राजवाडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच या प्रकरणात मामा राजवाडेला (Mama Rajwade) ताब्यात घेतले जाणार आहे. तर पोलिसांनी पंजाब बारच्या मालकाकडून खंडणी मागितल्याच्या प्रकरणात राहुल जैन-बागमारसह इतरांना अटक केली आहे.

दरम्यान, यावेळी गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या (Unit One) पथकाने त्यांच्याकडून ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ हे देखील वदवून घेतले. तर विसे मळा गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित तुकाराम चोथवे अजूनही फरार असून, त्याच्या मागावर पोलिसांची (Police) पथके आहेत.

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...