ओझे | वार्ताहर | Oze
उमराळे बुद्रुक (Umrale Budruk) तालुका दिंडोरी (Dindori) येथील उमराळे ते उमराळे चौफुली रोडच्या ,जनता विद्यालय या ठिकाणच्या गेटजवळ मयूर सोनवणे,राम विष्णू दरेकर,विक्रम राजाराम घाडगे यांनी एका शाळकरी मुलास पळवून नेत अपहरण करण्याचा प्रयत्न केला.मात्र, मुलाच्या प्रसंगवधाने त्यांच्या अपहरणाचा डाव फसला गेला असून सदर आरोपींना उमराळेकरांच्या सहकार्याने दिंडोरी पोलीस ठाणे येथे ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी त्या आरोपीवर गुन्हा (Case) नोंद करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, उमराळे तालुका दिंडोरी येथील जनता विद्यालय येथे उमराळे गावातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. यातील कृष्णा अंबादास बोडके (वय-१३ वर्ष)हा विद्यार्थी (Student) ही या शाळेत शिक्षण घेतो.शाळा सुटल्यानंतर पायी घरी जात असताना, शाळेच्या गेटवर विक्रम घाडगे यांच्या सांगण्यावरून मयूर सोनवणे व राम विष्णू दरेकर यांनी कृष्णा यास तू तालमीत असताना विक्रमकडून उसनवारी पैसे घेतले असून ते परत देऊन टाक अशी धमकी दिली.
त्यावरून कृष्णाने माझ्याकडे पैसे (Money) नाहीत असे सांगितल्याचा राग मयूर व राम याना आल्याने त्यांनी कृष्णा यास दमदाटी करून मोटरसायकल वर बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कृष्णा याच्या प्रसंगवधाने व उमराळेकरांच्या सहकार्याने आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर दिंडोरी पोलीस ठाणे (Dindori Police Station) येथे गुन्ह्याची नोंद करून अटक (Arrested) करण्यात आली आहे.