Tuesday, November 17, 2026
Homeक्राईमNashik Crime : 'ब्रेकअप'च्या वादातून प्रियकराचा राडा; प्रेयसीच्या घरात शिरुन दिली आत्महत्येची...

Nashik Crime : ‘ब्रेकअप’च्या वादातून प्रियकराचा राडा; प्रेयसीच्या घरात शिरुन दिली आत्महत्येची धमकी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

प्रेमसंबंधाला दाेन वर्ष झाले असतानाच, प्रेयसीने (Girl friend) अचानक ‘ब्रेकअप’ चा निर्णय घेतल्याने संतापलेल्या प्रियकराने (Boyfriend) अल्पवयीन प्रेयसीच्या घरात शिरुन तुफान राडा घातला. ही घटना पंचवटीतील नवनाथनगरजवळ असलेल्या चैतन्य बेकरीजवळ १५ ऑगस्ट राेजी घडली.

- Advertisement -

या घटनेत प्रियकर संशयित भूषण धनराज महाले( वय २४, सध्या रा. मानकर मळा, मखमलाबाद) याने पीडितेचे केस ओढून मारहाण करीत ‘तुला फिनाईल पाजून मी पण आत्महत्या करेन’, अशी धमकी दिल्याने अखेर पंचवटी पाेलिसांत (Panchvati Police) पाेक्साेअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषणला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, घाबरलेल्या पीडितेने सुटका करुन घेत पंचवटी पाेलीस ठाणे (Panchvati Police Station) गाठले व घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे करत आहेत.न्यायालयाने भूषणला पाेलीस काेठडी (Police Custody) सुनावली आहे.

ताज्या बातम्या

Crime News : इन्स्टाग्रामवर अश्लील फोटो टाकून प्रेयसीची बदनामी

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri प्रेमसंबंध असताना प्रेयसीची बदनामी करण्याच्या उद्देशाने तिचे अश्लील फोटो इन्स्टाग्रामवर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी प्रेयसी व...