Friday, June 19, 2026
Homeक्राईमNashik Crime : भांडण सोडवणे बेतलं जीवावर; दाजीने मेव्हण्याचे केले अपहरण

Nashik Crime : भांडण सोडवणे बेतलं जीवावर; दाजीने मेव्हण्याचे केले अपहरण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विवाहित बहिणीसह दाजीच्या भांडणात मध्यस्थी करुन नेहमीच वाद साेडविण्याचा प्रयत्न करणे एका साल्याला भाेवले आहे. संशयित दाजीने मित्राच्या मदतीने नाशिकच्या (Nashik) अंबडमधील (Ambad) घरातून साल्याचे अपहरण (Kidnapped) करीत जालना जिल्ह्यातील (Jalna District) परतूर (Partur) येथील मूळ गावी नेऊन मारहाण केली. मात्र, अंबड पाेलिसांनी काॅलट्रेसिंगसह इतर बाबी पडताळून दाजीेचे घर गाठून साल्याची सुखरुप सुटका केली. एखाद्या सिनेमात दाखविला जाणारा प्रसंग प्रत्यक्षात घडत असल्याने साल्याच्या पायाखालची वाळू पुरती घसरली हाेती. दरम्यान, अंबड पाेलिसांनी (Ambad Police) संशयित दाजी संदीप भिमराव चव्हाण(वय ३०, रा. घरकूल याेजना, अंबड) याला अटक केली असून त्याच्या मित्राचा शाेध सुरु केला आहे. चव्हाणला न्यायालयाने तीन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.

- Advertisement -

अंबड परिसरातील चुंचाळेलगत असलेल्या घरकूल याेजना परिसरात शितल अंबुरे (वय २५) ही विवाहिता पती अनिल तसेच कुटुंबासह वास्तव्यास आहे. ती कंपनीत कामगार असून, पती माेलमजुरी करताे. दरम्यान, तिची नणंद ज्याेती संदीप चव्हाण तिचा पती संदीप हे दाम्पत्य घरकूल याेजनेतच (Gharkul Scheme) वास्तव्यास आहेत. त्यांचा विवाह झाल्यानंतर, कालांतराने दाेघांत वाद सुरु झाले. हे वाद वारंवार हाेत असताना, शितलचा पती अनिल ‘साला’ या नात्याने हेच वाद मिटवित हाेता. तसेच मध्यस्थी करत हाेता. ही बाब दाजी संदीप याला खटकत हाेती. ‘आमची भांडणे किंवा वाद झाले की, हा मध्ये येताे आणि मिटवून निघून जाताे’, यामुळे ताे संतप्त व्हायचा. त्यामुळे त्याने साल्यावर ‘खुन्नस’ धरुन त्याला कायमचा धडा शिकविण्याचा विडा उचलला.

त्यानुसार, ११ सप्टेंबर राेजी अनिल अंबुरे (साला) घरीच असताना त्यांची पत्नी शितल सकाळी कंपनीतील (Company) कामासाठी गेली असता सायंकाळी पाच वाजता घरी परतली. तेव्हा तिला घरात कुणीच आढळले नाही. ती शाेधाशाेध करत असतानाच सायंकाळी साडेसाड वाजता तिच्या मोबाईलवर संदीप चव्हाण याने फाेन करुन ‘मी संदीप बोलतो आहे, तुझ्या नवऱ्याला उचलून आणले आहे. त्याला रात्रीतून मारुनच टाकताे’, असे धमकावून शिवीगाळ केली. तेव्हा संदीपने त्याच्या मित्राने अनिल अंबुरे यांना मारहाण केली. ‘शितल हे मला मारत आहेत, वाचव मला’, असा पतीच्या ओरडण्याचा आवाज कानी पडताच, तिने अंबड पाेलीस ठाणे गाठले व पाेलिसांना घटनेची माहिती दिली.

दरम्यान, पाेलिसांनी (Police) गांभीर्य ओळखून आवश्यक ती पावले उचलत तपास सुरु केला. तेव्हा काॅल ट्रेसिंगसह लाेकेशनमुळे संशयित चव्हाण हा जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील गावी असल्याचे आढळले. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या सूचनेने उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड आणि डीबीचे पथक जालना (Jalna) येथे रवाना केले. पथक परतून येथे पाेहाेचले असता, संशयित चव्हाण याने अंबुरे यांचे अपहरण करुन मारहाण (Beating) केल्याचे आढळले. पथकाने सुखरुप सुटका करुन चव्हाणला अटक (Arrested) करीत नाशिक गाठले.

समजूत काढणेच बेतले

संदीप भिमराव चव्हाणचे पत्नीशी भांडणे झाली की, अंबुरे मध्यस्थी करीत हाेते. मात्र, संदीपने हीच सकारात्मक बाब नकारात्मक ठरवून साल्याचे कांड करण्याचा प्रयत्न केला. वेळीच पाेलिसांची मदत मिळाल्याने त्यांचा जीव वाचविण्यात यश आले असून आता संदीपच्या मित्राचा शाेेध सुरु आहे.

संदीप ड्रायव्हर, भांडणे मिटविण्याचे कारण

संदीप हा जालना, नाशिक, पुणे या मार्गावर खासगी ट्रॅव्हल्सवर चासक आहे. ताे नेहमी जालना, परतूर येथील ओळखीतून वाहतूकदारांकडून वाहने घेऊन प्रवासी भाडे घेऊन नाशिकला येताे जाताे. प्रसंगी शेतमालाची वाहतीक करताे. त्याने राठाेड यांच्याकडून कार प्रवासी भाडेतत्वावर घेऊन नाशिक गाठले आणि घरकूल याेजनेत राहणाऱ्या साल्याचे अपहरण केले. हे अपहरण केल्यावर संशयितांनी मद्यपान केले व त्याच नशेत फाेन काॅल केल्याचे समाेर आले आहे. दरम्यान, संदीप याने अंबुरे यांनी गाेडीत बाेलून अनेक नातलगांचे भांडणे मिटवायला जायचे आहे असे सांगून गाडीत बसविले. प्रवासादरम्यान, साल्याला अनेकदा चाेप देऊन गप्पही केले. अपहरण झाल्याचे अंबुरे यांना फार शेवटी लक्षात आले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ओळखपत्र अनिवार्य आणि पेन्सिलचा वापर !

0
अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे | Ahilyanagar महाराष्ट्र शासनाने माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत असणार्‍या जुन्या नियमांचे अधिक्रमण करून राज्यात नवे महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 लागू केले...