Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime : मैंदच्या पत्नीकडे खंडणीची मागणी; पोक्सोचा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी...

Nashik Crime : मैंदच्या पत्नीकडे खंडणीची मागणी; पोक्सोचा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी चौघींचे षड्यंत्र

नाशिक | प्रतिनिधी । Nashik

अवैध सावकारीत हात बरबटलेल्या सराईत कैलास मैंद (Kailas Maind) याच्यावर ‘पोक्सो कायद्यान्वये खोटा गुन्हा नोंद करण्यासाठी चौघींनी षड्यंत्र रचल्याचा दावा त्याची ‘समाजसेविका’ पत्नी प्रमिला कैलास मैंद यांनी केला आहे. त्यानुसार दाखल फिर्यादीनुसार संशयित महिला अर्चना परदेशी, तिची मुलगी स्नेहल भालेरावसह कविता पवार, रंजना कांबळे यांच्यावर खंडणीचा गुन्हा *(Extortion Case) दाखल झाला आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे तक्रार नोंदविण्यासाठी उपनगर पोलिसांत (Upnagar Police) आलेल्या मैंद याच्या पत्नीस वरील महिलांनी ‘आमच्याविरोधात फिर्याद देऊ नको, परिणाम वाईट होतील’, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. प्रमिला मैंद (रा. हरीविहार, जेलरोड) यांनी शनिवारी (दि. २३) दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, त्या घरी असताना (दि. २० सायंकाळी साडेसात वाजता ९५७९५३०३७७ या अनोळखी नंबरवरून फोन आला. संवाद साधणाऱ्या महिलेने ‘तुमच्या पतीवर पोक्सोअंतर्गत खोटा गुन्हा दाखल करणार आहोत, आम्हाला सैलानी बाबा स्टॉप येथे भेटायला या’, असे सांगितले.

त्यानंतर, प्रमिला या ‘मानसपूत्र तेजस व आईची मैत्रीण सुमन आहेर यांच्यासह सैलानी बाबा स्टॉप येथे पोहचल्या. तेव्हा दोन अनोळखी महिलांनी सुमन आहेर यांना धमकावून ‘तुम्ही येथेच बसा असे म्हणून प्रमिला यांना बाजूला नेले. तेव्हा एका महिलेने अर्चना परदेशी असे नाव सांगून कविता पवार व रंजना कांबळे यांच्याकडे राजकीय नेत्यांकडून (Political Leader) कैलास मैंदवर खोटा गुन्हा दाखल करण्याचे काम आले आहे, असे सांगितले. तसेच, गुन्ह्यासाठी हॉटेल व अल्पवयीन मुलगी असे सर्वच ‘मॅनेज’ असून आमची १५ महिलांची टीम आहे. त्यामुळे ‘गुन्हा दाखल करायचा नसेल तर, आम्हाला पाच लाख रुपये द्या’ असे म्हणूण खंडणी मागितली.

पोलीस आयुक्तांची भेट

या प्रकारानंतर अवैध सावकार व खंडणीखोर संशयित मैंद याची समाजसेविका पत्नी प्रमिला यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर आयुक्तांनी उपनगर पोलिसांना कायदेशिर कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून आता संशयित परदेशीसह तिची मुलही व अन्य दोन तरुणी कोण आहेत, याचा तपास सुरु झाला आहे. संशयित महिलांनी याआधी अशाच प्रकारे ‘सरकारी अधिकाऱ्याला अडकवले आहे. तो नांदगावात राहतो व आता सस्पेंड आहे, असा दावा प्रमिला यांच्याकडे केला आहे. या दाव्याची पडताळणी होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

सुप्रीम

UPI पेमेंट शुल्कावर सुप्रीम कोर्टाची मोठी दखल; केंद्र-RBIला नोटीस, चार आठवड्यांत...

0
नवी दिल्ली | New Delhiयूपीआयच्या निवडक व्यापारी व्यवहारांवर (P2M) मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे....