Saturday, April 4, 2026
Homeक्राईमNashik Crime : हर्ष ठाकूर वादात! कार्यकर्ता महिलेस मारहाण, फिनाईल पाजल्याचा दावा

Nashik Crime : हर्ष ठाकूर वादात! कार्यकर्ता महिलेस मारहाण, फिनाईल पाजल्याचा दावा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

हिंदुत्ववादी चळवळीत सक्रिय महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये फूट पडल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. हिंदू जनजागृती, गोरक्षण आणि लव्ह जिहादविरोधी आंदोलनांत पुढाकार घेणाऱ्या संशयित हर्ष ठाकूर (Harsh Thakur) ऊर्फ करिश्मा किशनसिंग परिहार हिच्यावर तिच्याच सहकारी कार्यकर्तीने गंभीर आरोप करत गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. २४ वर्षीय प्रेरणा नीलकमल वैष्णव हिने दिलेल्या फिर्यादीनुसार, हर्षने नोकरासारखी वागणूक देऊन, अमानुष मारहाण करत फिनाईल पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले आहे.

- Advertisement -

प्रेरणा वैष्णव ही काही महिन्यांपासून हर्ष ठाकूरच्या टीममध्ये कार्यरत होती. फिर्यादीनुसार, हर्ष ठाकूर इतर मुलींशी मला बोलण्यास मज्जाव करून घरातील सर्व कामे करून घेत होती, असा दावा प्रेरणाने केला आहे. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रेरणाचा वाढदिवस असताना, तिने हर्षला न सांगता आईकडे जाण्यासाठी निमाणी बसस्टॅण्ड गाठले. याचा राग धरून हर्षाने तिला गाठून मारहाण (Beating) केली आणि तिचा मोबाईल काढून घेतला. हा छळ येथेच थांबला नाही तर १३ फेब्रुवारी रोजी रात्री हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या प्रेरणाला हषूने सर्वांसमोर शिवीगाळ केली. त्यानंतर गंगाघाट येथील कपालेश्वर मंदिरासमोर पुन्हा मारहाण करून मोबाईल फेकून दिला.

दरम्यान, घरात नेल्यानंतर प्रेरणाचे केस धरून तिला खाली पाडले, कमरेत लाथा मारल्या आणि बाथरूममधून फिनाईलची बाटली आणत तिच्या तोंडात ओतली. ‘तू मेली तरी चालेल, माझे कोणीही काही करू शकत नाही’ अशी धमकीही हषूने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा (Case) नोंद झाला असून आता पंचनामा व जाबजबाबानंतर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे हर्षला ताब्यात घेण्यासह अटकेची (Arrested) कारवाई होण्याची शक्यता आहे.

हर्षचा इतिहास

हर्षवर नाशिक शहरात यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. ऑक्टोबर २०२५ मध्ये सिडको परिसरात तत्कालीन माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या नवरात्रोत्सवात हजारो भाविकांसमोर प्रक्षोभक भाषण करून दोन गटांत तेढ निर्माण केल्याप्रकरणी अंबड पोलिसांत (Ambad Police) गुन्हा दाखल आहे. तसेच नोव्हेंबर २०२४ मध्ये भद्रकाली पोलीस ठाण्यातही अशाच स्वरुपाचा प्रक्षोभक विधाने केल्याचा गुन्हा नोंद आहे.

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

या घटनेनंतर नाशिकमधील (Nashik) हिंदुत्ववादी गटांमध्ये खळबळ उडाली आहे. गंगापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले असून, हर्ष ठाकूर आणि प्रेरणा वैष्णव या दोघांचे समर्थक सोशल मीडियावर एकमेकांविरुद्ध पोस्ट टाकून आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

मुद्दे

  • हर्ष ठाकूर गोरक्षण, लव्ह जिहादविरोधात कार्यरत वक्ता
  • सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर साडेसात लाख फॉलोवर्स
  • अनेक दाखल गुन्ह्यांत पोलीसच फिर्यादी
  • दोन भिन्न समाजात, धर्मांत तेढ निर्माण केल्याचे गुन्हे अधिक
  • हर्ष मूळची नांदेडची, सध्या सातपूरला वास्तव्य
  • फिर्यादी प्रेरणा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी

ताज्या बातम्या

Rahuri By-Election : राहुरी पोटनिवडणुकीत ट्विस्ट! काँग्रेस उमेदवार देणार, चारजण इच्छुक

0
राहुरी (प्रतिनिधी) काँग्रेस पक्षाने बारामतीसोबतच राहुरी या विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या भूमिकेला पक्षश्रेष्ठींनी गुरुवारी मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे. राहुरीसाठी...