Friday, April 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून सव्वा दोन कोटींचा गंडा

Nashik Crime : दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून सव्वा दोन कोटींचा गंडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आमच्यामार्फत गुंतवणूक (investment) केल्यास वर्षभरात दुप्पट परतावा व दररोज बँक खात्यात नफा जमा करण्याचे आमिष (lure) दाखवून कोल्हापूरमधील (Kolhapur) तिघांनी नाशिकच्या (Nashik) गुंतवणुकदारांना २ कोटी ३१ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) दाम्पत्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

नाशिकरोडच्या रोहिणी नगरमधील रहिवासी समाधान साहेबराव हिरे (४४) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित नितेशकुमार मुकुदास बलदवा, दुर्गा बलदवा (दोघे रा. आझाद रोड, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) व नजीम मोमिन (रा. बागल चौक, जि. कोल्हापूर) या तिघांनी डिसेंबर २०२३ पासून गंडा घातला. हिरे व बलदवा दाम्पत्यांची जागा खरेदी-विक्री व्यवहारातून ओळख झाली होती. दाम्पत्याने हिरे यांना गुंतवणुकीतून जादा नफा देण्याचे आमिष दाखवले. तसेच गुंतवणुकीसाठी इच्छुक असलेल्यांसोबत एकदा बैठक घ्या असे सांगितले.

त्यानुसार हिरे यांनी त्यांच्या मित्रांनाही (Friends) याची माहिती देत बिटको येथील हटिल पवन व हिरे यांच्या घरी संशयित (Suspect) बलदवा दाम्पत्य व नजिम यांची भेट घालून दिली. तिया संशयितांना हिरे यांनी १ कोटी ९० लाख रुपये तर त्यांच्या मित्रांनी ४१ लाख रुपये संशयितांना दिले. ठरल्याप्रमाणे सुरुवातीचे तीन महिने संशयितांनी परतावा दिला. मात्र त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हिरे यांनी नाशिकरोड पोलिसांकडे तक्रार करीत फिर्याद दाखल केली. संशयितांनी याचप्रकारे इतरांनाही फसविले आहे.

अशी केली कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक

संशयितांनी हिरे व त्यांच्या मित्रांना शेअर मार्केटमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा मिळत असल्याचे सांगितले. यासाठी त्यांनी त्यांच्याकडील लॅपटॉपमध्ये त्यांच्या इतर ग्राहकांना नफा कसा दिला, पैसे कसे दुमट होतात, याची माहिती दाखवली. तसेच गुंतवणुकीच्या १५ टक्के रकमेचा परतावा दररोज मिळणार, पैशांची सर्व हमी बलदवा दाम्पत्याने घेतल्याचे भासवले त्यामुळे हिरे व इतरांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...