Monday, August 17, 2026
HomeनाशिकNashik Crime : ग्राहक-तृतीयपंथी यांच्यात पोलिसांसमोरच राडा; गुन्हा दाखल

Nashik Crime : ग्राहक-तृतीयपंथी यांच्यात पोलिसांसमोरच राडा; गुन्हा दाखल

कोयते काढल्याचा आरोप

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुंबईनाका पोलिसांच्या (Mumbai Naka Police) हद्दीतील मुख्य रस्त्यावर गुरुवारी रात्री (दि. २४) ग्राहक आणि तृतीयपंथीयांत क्षुल्लक कारणातून झालेला वाद (Dispute) टोकाला पोहोचला. विशेष म्हणजे भरस्त्यात पोलिसांसमक्ष हा राडा झाला. यावेळी एका तृतीयपंथीयाच्या हातात धारदार कोयता दिसून आल्याचा दावा बघ्यांनी केला.वेश्याव्यवसायातून हा वाद झाल्याचे तपासात समोर येत आहे. दरम्यान, या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला असून, पोलिसांनी दोन्ही गटांतील चौघांना अटक केली आहे.

- Advertisement -

त्र्यंबक नाक्यावरील (Trimbak Naka) पिनॅकल मॉलसमोरील एचपी पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस शिपाई राजेंद्र नाकोडे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संशयित प्रणव विनोद शेवाळे (वय २३ रा. सिडको, नाशिक), चिराग दिनेश वानखेडे (वय २०, रा. फुलेनगर, पंचवटी), आकांक्षा साहेबराव सकवर (१९, रा. फुलेनगर, पंचवटी) आणि बॉबी बजरंग गुंजाळ (१९) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही गटांतील संशयितांची नावे आहेत.

दरम्यान, संशयित (Suspected) शेवाळे, वानखेडे यांच्यासह इतर संशयित त्र्यंबक नाका येथे रात्री मद्यधुंद अवस्थेत आले. त्यातच, दोन्ही गटांतील वाद टोकाला गेल्याने त्यांच्यात हाणामारी झाली. भरस्त्यात हाणामारी सुरु झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये (Citizen) दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखत भद्रकाली व मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

ताज्या बातम्या

Accident News : दूध टँकर व दुचाकीचा अपघात; एक ठार

0
अकोले |प्रतिनिधी| Akole तालुक्यातील लिंगदेव येथील ठाकरवाडी परिसरात दुचाकी (Bike) आणि दूध टँकरमध्ये (Milk Tanker) जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) होवून दुचाकीस्वार जागीच ठार...