Thursday, July 23, 2026
HomeनाशिकNashik Crime : 'नाशिक की गुन्हेगारी जानलेवा…' असा रिल्स बनवला; मग पोलिसांनी...

Nashik Crime : ‘नाशिक की गुन्हेगारी जानलेवा…’ असा रिल्स बनवला; मग पोलिसांनी काढली थेट धिंड

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

रिल्स (Reels) बनवून सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जेलरोड परिसरातील कॅनल रोड आम्रपाली झोपडपट्टी भागात राहणाऱ्या पाच जणांना उपनगर पोलिसांनी (Upnagar Police) काल (सोमवारी) अटक केली होती. त्यानंतर आता त्यांची धिंड काढण्यात आली. उपनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे रिल्स बनवून दहशत निर्माण करून आपले साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.

- Advertisement -

‘नाशिक की गुन्हेगारी जानालेवा है रे, सरळ घरात घुसून सामान अडकवतो रे’, अशा प्रकारचे रील्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सोहेल पठाण, गौरव भामरे, आदित्य अहिरे, किशोर चव्हाण, विनोद घुगे सर्व राहणार कॅनल रोड, आम्रपाली नगर,झोपडपट्टी यांनी सोशल मीडियावर रील्स व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, त्यानंतर या सर्वांना सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी कारवाई करून अटक केली. तसेच याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या सर्वांची काल (सोमवारी) मुक्तिधाम व परिसरात धिंड काढण्यात आली. उपनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे (Action) सर्वत्र स्वागत होत आहे.

ताज्या बातम्या

Nashik Rain News : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला; दुतोंड्या मारुतीच्या...

0
नाशिक | Nashik शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात रात्रभर जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पावसाच्या (Rain) सततच्या सरींमुळे गोदावरी...