Sunday, June 14, 2026
Homeक्राईमNashik Crime : सासूच्या टोमण्यांना वैतागली; मग सुनेने थेट गळा आवळून संपवलं

Nashik Crime : सासूच्या टोमण्यांना वैतागली; मग सुनेने थेट गळा आवळून संपवलं

चक्कर येऊन पडल्याचा रचला बनाव

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वयोवृद्ध सासूच्या (Mother in law) त्रासासह नेहमीच्याच टोमण्यांना कंटाळून वैतागलेल्या सुनेने तिचा गळा आवळून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या (Deolali Camp Police Station) मागील बाजूस असलेल्या आडके नगरात मंगळवारी (दि. २) घडली.

- Advertisement -

सुनेने (Daughter-in-law) गळा आवळल्यानंतर तिला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात (Hospital) दाखल केल्यावर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, शवविच्छेदन अहवालात गळा आवळून तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने अखेर देवळाली कॅम्प पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून चौकशीअंती संशयित सून शबाना अब्दुल अजीज शेख (रा. साईदर्शन अपार्टमेट, आडकेनगर, देवळाली कॅम्प, नाशिक) हिला अटक केली आहे.

सकिना गफार शेख (वय ८९, मूळ रा. बागूल नगर, विहितगाव) असे मृत सासूचे नाव आहे. आडके नगरात शेख कुटुंब वास्तव्यास असून काही वर्षांपूर्वी अब्दुल अजीज यांचा विवाह (Marriage) शबाना सोबत झाला आहे. अजीज हे लॉन्ड्री व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची आई सकिना ही वृद्धत्वामुळे अंथरुणाला खिळून होत्या. अशातच त्या सून शबाना हिला वारंवार वेडवाकडं बोलून काही ना काही टोमणे मारत होत्या. सासूच्या नेहमीच्या या त्रासाला ती पुरती वैतागली होती.

अशातच, पानाचे निमित्त झाले आणि संतप्त शबाना हिने सासूला ‘जन्नत’ ला धाडले. दि. २ ऑगस्ट रोजी सकिना यांनी मुलगा रौफ याला ‘पान’ आणण्यास सांगितले. त्यातून सासू-सुनेतील वाद इर्षेला पोहोचला. शिवीगाळ सुरु असतानाच, शबाना हिने सकिना यांचा गळा आवळला. त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. यानंतर शबीना व तिचा दीर रौफ यांनी उपचारार्थ बिटको रुग्णालयात (Bitco Hospital) दाखल केले.

दरम्यान, येथे उपचारादरम्यान, ३ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. सकिना यांच्या आधारकार्डवर विहितगावचा पत्ता नमूद असल्याने नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तेव्हा तपासात एक ना अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा झाला. त्यातच पोलिसांना शवविच्छेदन अहवाल मिळाल्याने अखेर सखोल तपास सुरु झाला. तेव्हा सकीना यांचा मृत्यू अपघाती नसून खून केल्याने झाल्याचे उघड झाले. वरिष्ठ निरीक्षक श्रीनिवास देशमुख तपास करीत असून न्यायालयाने शबीना हिला १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

असा झाला बनाव उघड

‘सकीना घरात असताना खाली पडल्या व त्या बेशुद्ध झाल्या’, हे पाहताच आम्ही त्यांना बिटको रुग्णालयात दाखल केल्याचे शबाना हिने पोलिसांना व डॉक्टरांना सांगितले होते. बिटको रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालय अर्थात नाशिक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये सकिना यांचे शवविच्छेदन करण्यात आले. येथील डॉक्टरांनी शवचिकित्सा केली. त्यात सकिना यांच्या गळ्यावर व्रण आढळले. तसेच गळा आवळून त्यांचा श्वास गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिला. त्यामुळे देवळाली कॅम्प पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आणि सकिनाला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा तिने खून केल्याची कबुली दिली.

ताज्या बातम्या

Udaipur Intercity Express accident : मोठी दुर्घटना! आग लागल्याची अफवा पसरल्याने...

0
उदयपूर । Udaipur भय आणि घबराट माणसाकडून काय करून घेईल याचा नेम नसतो, पण कधीकधी हीच घबराट प्राणांतिक ठरते, याचाच एक अत्यंत दुर्दैवी प्रत्यय मध्य...